Tuesday, April 17, 2012

मनोज रंधे



नटराज शंकर हे भारतीय संस्कृतीचे ऐक अविभाज्य अंग ,आणि नृत्यकला हे चौसष्ठ कलांपैकी ऐक श्रेष्ठ तम कला हा विश्वास..राधा आणि कृष्णाची रासलीला हा भारतीय समाजाचा आवडता परंपरागत नृत्यप्रकार ,
भारतीय साहित्त्यातले बराचेसे खंड ह्या दोन अनुभूतींच्या शब्दांकानात वर्णीत झाले आहेत ,हळद आणि कुंकू ह्या जोडी प्रमाणे गायन आणि नृत्य हि कलेची दोन्ही प्रकार हातात हात घालून येत ,गायन कले प्रमाणे नृत्यकलेलाही लोकाश्रय बरोबर राजाश्रय होता ,भारताच्या प्राचीन इतिहासापासून ब्रिटीश पूर्व इतिहास पर्यंत गायन कले एवढीच प्रतिष्ठा नृत्य कलेला होती .तन्जौअर ,केरळ,अवध येथील शासक नृत्यकलेचे केवळ आश्रय दातेच नव्हे तर उपसाकाही होते .
काळाच्या ओघात नृत्याकालेला ऐक गौण दर्जा प्राप्त झाला .ऐक गौण दर्जाची कला असे रूप प्राप्त होऊन नर्ताकाना  नाच्या ह्या शब्दात संबोधले जाऊ लागले ,ह्या कलेवर ऐक स्त्रैण छाप पडला तिचे शिव शंकरी रूप विलयास जाऊन ,लोककलांच्या वळचणीला जाऊन नाच्या रूप प्राप्त झाले नटेश्वराचे मराद्नी रूप जाऊन नाच्या चे क्लैब्यं कधी प्राप्त झाले ते कळले सुद्धा नाही

स्वातंत्रोत्तर काळा परत एकदा नृत्यकलेला प्रतिष्ठा प्राप्त होतेय ,भारत नात्याम ,कत्थक ,मणिपुरी अश्या अभिजात नृत्यप्रकारा बरोबर ,पोवाडे ताब्लो  नृत्य नाटिका अशा विविध संयुक्त कला प्रकारांना अभिजानाकडून हि लोकाश्रय मिळतो आहे ,नाच आणि नाच्या ह्या शब्दात प्रतीत होणारी हीन भावना जाऊन नृत्य आणि नर्तक अश्या प्रतिष्ठित संबोधनाची जोड मिळते आहे , अभिजानाचा लोकाश्रय आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळण्यासाठी "कित्येक गोपीकृष्ण ,पार्वती कुमार आणि बिरजू महाराजांचे अथक परिश्रम ह्या च्या मुळाशी आहेत , कलेला प्रादेशिक अथवा राष्ट्रीय सीमा बंदिस्त करू शकत नाही ,पाश्चात्य नृत्य कलेचे अनेक प्रकार भारतीय प्रेक्षकाला रुचतील अश्या प्रकारे सदर करण्याचा मनोदय असल्याने त्याचे सादरीकरण मनोज करतो ,आणि त्याच्या ह्या प्रयत्नांना अमाप लोकप्रियता मिळते आहे. ,
सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाल्याने बरचसे युवक ह्या कलेचे उपासक झाले आहेत , असाच ऐक कलोपासक नृत्याप्रेमी युवा जळगावचा "मनोज रंधे "
मनोज हा २१ वर्षाचा युवक आहे वयापेक्षाही मोठे कर्तृत्व प्राप्त झालेला हा युवक नृत्याला आपला आत्मा समजतो ,नृत्य कलेला गत वैभव प्राप्त करून देण्याच्या स्वप्नाने झपाटलेला हा युवक प्रतिभा आणि अथक श्रम ह्यांच्या जोरावर हे ऐक उपेक्षि कला दालन  पुनरोज्जीवित करण्याचा प्रयत्न करतोय  त्याची ऐक नृत्य संस्था आहे ,त्या संस्थेचे बरेचसे कार्यक्रम विनामूल्य असतात ,,अभिजात नृत्य प्रकार आजच्या युवा पिढीला आवडतील रुचतील अश्या प्रकारे सदर करणे  समाजातल्या नाहीरे वर्गांसाठी निशुल्क वर्ग चालवणे,लोककलांचे संशोधन सादरीकरण अश्या अनेक उपक्रमात व्यस्त असलेला मनोज युवा पिढीला ऐक आदर्श निर्माण करून दाखवतो आहे,आपल्या संस्थे द्वारा कित्येक युवकांना प्रगतीचा मार्ग दाखवतो आहे
विद्द्यर्थासाठी अतिशय अल्प मोबदल्यात तर कधी कधी निशुल्क प्रशालांचे आयोजन करणे हे ह्याचे आवडते सामाजिक कार्य ,
अगम्य प्रतिभेचे लेणे लाभलेला मनोज शत प्रतिशत भारतीय आहे मराठी मातीचा त्याला अभिमान आहे ,त्याच्या सर्व नृत्य प्रकार अभूतपूर्व यश संपादित करताहेत , काळाच्या ओघात पुसत होत चालेल्या लोककलांचे पुनारोत्जीवन करण्याच प्रयत्न मनोज नेटाने करतो आहे मनोजचे स्वप्न आहे कि मला नाचाचे नृत्य बनवायचे आहे आणि नटरंग ला नटराज .
शिव शंकर च्या नटराज स्वरूपाला मैत्रायानाचे सदर अभिवादन
शशांक रांगणेकर
मुंबई ९८२१४५८६०२





Friday, April 13, 2012

सुनील अग्रेसर


सुनील अग्रेसर
कदाचित आजच्या पिढीला माहित हि नसेल ,आमच्या लहानपणी एक घरघुती कालीडोस्कॉपे यायचा,नळीत तीन काचेच्या आरशाच्या त्रिकोणी आकाराच्या पिऱ्या मिड मध्ये काचेच्या रंगी बेरंगी बांगड्यांचे तुकडे घातलेले असत आणि त्यांचे प्रतिबिंब श्व्वाताच्या काचेच्या पडद्यावर दिसत असे ,रंगी बेरंगी ती प्रतिबिंबे आम्हा मुलांना फार आवडत तांस तास ते बघत राहणं हा माझ्या बालपणीच्या सर्व मुलांचा एक लाडका खेळ होता ,त्यात सर्वात मजेची गोष्ट म्हणजे एकदा दिसणारी रंगीत आकृती चित्र परत आकाराला येत नसे ,दर वेळेला एक वेगळीच आकृती दिसे आणि किंमत फार तर आठ आणे अथवा रुपया ,अर्थात त्यावेळी रुपयाही किंमत होती .
आता आयुष्याच्या संध्याकाळी असाच एक कालीदोस्कॉपे बघायला मिळतोय नाव "सुनील अग्रेसर",कलेच्या च्या सर्व क्षेत्रात आपला सुनील ठसा उमटवणारा हा सुनील अग्रेसर खरोखर सर्वार्थाने अग्रेसर आहे ,अभिनय ,दिग्दर्शन ,निर्मिती ह्या सर्व क्षेत्रात ठसा उमटवणारे बरेच प्रतिथ यश माझ्यापाहण्यात आहेत पण त्या यशाबरोबर सहृदय तेचे परोपकारी गुण विशेष मात्र ह्याच्या कडे आहेत.
नवागतांसाठी सिनेमा क्षेत्राच्या मायानगरीत एक विश्वासू मार्गदर्शकाचे व्रत अचारणारा सुनील हा जेव्हडा मोठा कलाकार त्याही पेक्षा मोठा माणूस आहे ,त्याचे व्रताच माणुसकीचे आहे मायानगरीत  नवागात प्रवेशणाऱ्याचे मनापासून "योग क्षेमं वहाम्यहम"म्हणत आपल्या अनुभवाचे भांडार सर्वांसाठी मुक्त कर णाऱ्या सुनील ला  मैत्रायण चा मानाचा मुजरा

शशांक रांगणेकर मुंबई ९८२१४५८६०२

Thursday, April 12, 2012

आनंद यात्री मी

आनंद यात्री मी नही मजला दुखाची पत्रास
मैलाचे हे दगड भेटतील जीवनात हमखास
त्या दगडांवर कोरीन शिल्पे गाईन अमृत गाणी
नको सावली पराभवाची कधी न गाई विराणी
त्या गाण्याचा सूर वेगळा कधीच गमला नाही
तव स्नेहाच्या किरण प्रकाशे काळ रात्र दूर होई
गातील दूत त्या रात्रीचे तेजाची गुण गाणी
 सरे आपदा नैराश्याची उमगता नारळातले पाणी
शशांक रांगणेकर

अगम्य तू अतर्क्य तू तुला नभात शोधतो अंधाऱ्या काळ रात्री मनात तू प्रकाशतो

अगम्य तू अतर्क्य तू तुला नभात शोधतो
अंधाऱ्या काळ रात्री मनात तू प्रकाशतो
कालिंदीच्या तटावरी बासुरीच्या सुरांवारी
वृन्दावनी गोकुळात राधेच्या आधारावरी
तू मलाच भासतो मी तुलाच पाहतो
पिउनी विष मीरेचे अंधत्व सुरदासाचे
विणाशी वस्त्र कबीराचे सख्य मैत्र पार्थाचे
नश्वर मी ईश्वर तू योग्यातील तू योगेश
नील पंखी मोरातील एकमात्र तू मयुरेश
स्वरतीत ओंकार तू बुद्धी दाता तू गणेश
तू मलाच भासतो मी तुलाच पाहतो
शशांक रांगणेकर
९८२१४५८६०२

ज्ञान अडीच अक्षरांचे

कान्हा गोकुळाची गौळण मी राधा
तुझ्या प्रेमाची झाली मला बाधा
भूत कसे उतरावे तुझिया प्रेमाचे
गुज मनातले कसे जनी लपायचे
प्रेमाच्या बाधेवर मिळेल का उतारा
प्रीत भावनेचा का लपेल हा पिसारा
कालिंदीच्या तीरावर पौर्णिमेच्या रात्री
ओसंडातील प्रणय रंग ओघळतील पात्री
सोडून बाध लज्जेचे होईन मी मुक्त
ज्ञान अडीच अक्षरांचे कळेल अद्द्वैत

Wednesday, April 11, 2012

प्रसाद गणपुले

प्रसाद गणपुले
प्रसाद ची आणि माझी ओळख फार फार जुनी आहे     कदाचित त्याच्या जन्मा अगोदरची ,माझ्या आजोळी राहत असताना अंगणात एक पारिजातकाचे झाड होते ,बर्याच वेळा त्या पारिजातकाच्या फुलांचा सडा      पडायचा मन प्रस्सन व्हायचे ,तो पारिजातक अजूनही मन प्रसन्न करतोय ,ती प्रसन्नता आणि शुचिता देणारे आणखी एक झाड फक्त मनाच्या अंगणातले ,नाव "प्रसाद गणपुले"   फोने वर काका म्हणून साद द्यावितर प्रश्या नि ,अगदी २ G नव्हे तर 4G चे प्रक्षेपण ,थेट मनाला भिडणारे ,प्रसाद ची ओळख हे विधीलीखीतातला एक ईश्वरीय प्रसादच,नाहीतर आमच्या दोघांच्या वयातले अंतर ,पाहता कुठेही मेळ बसत नाही ,  प्रसादाने त्याच्या वाल वर टाकलेल्या प्रगतीचे सहा सोपान मला मनापासून भावले होते ,ह्या वयातली हि त्याची व ऐचारिक प्रगतीचा आलेख नक्कीच सृहानीय वाटला ,पावसाळ्यात मुंबई हून पुण्याला जाताना प्रवासात भेटणारे पाण्याचे छोटे छोटे झरे पाहून आजही प्रसाद आठवतो , काही काही व्यक्तीची देहबोलीच इतकी सुलेख असते कि त्या व्यक्तित्वाला प्रसन्नतेचा एक गंध परीमळतो , प्रसाद हे व्यक्तिमत्व इतके प्रसन्न आहे कि आठवणीनेच मनात प्रसन्नतेचा पारिजात फुलावा.    अजातशत्रू रूप हे प्रसादचे आणखी एक रूप कधीही कोणाबद्दलही कडवट पण ह्याच्या वाल वर दिसत नाही .यशस्वी उद्योजक 'कळकळीचा समाज प्रेमी ,मेहनती युवक ,उत्कृष्ट संघटक अश्या अनेक अनेक रूपा आड दडलेले प्रसादचे एक मला सर्वात भावणारे एक रूप "निरागस बालक"त्या निर्मोही रुपाला तोड नाही ,काळ कोणासाठीही थांबत नाही पण मनात असलेले प्रसादाचे निरागस बालरूप मात्र माझ्यासाठी मात्र कालातीत आहे ,प्रसाद आणि त्याच्या नियोजित वधूचा साखर ही काहीच दिवसात संपन्न होईल पण त्या कार्यक्रमालाही उपस्थित राहताना प्रसाद साठी खाऊ घेऊन जायची माझी इच्छाही तेवढीच प्रबळ राहील ,निरागस चेहर्याचे आणि अल्लोकिक बुद्धिमत्तेचे आणि अनुपम सहृदयतेचे वरदान प्राप्त झालेला प्रसाद आणि काका म्हणून येणारी त्याची हाक हे इस्वरीय वरदान नाही तर काय?
शशांक रांगणेकर

Monday, April 2, 2012

ढग आठवणीचे

ढग आठवणीचे मनी दाटता पाऊस वेळा येई
सुख शकुनाच्या मन मोराचा पंख फुलोरा फुलवी
मनी आठविता सल दुक्ख कळांचे काटा रुतून राही
भय दुक्खाच्या कंटक शल्ये विदीर्णता मनी येई
सुख दुक्खाच्या आठवणींचा कधी न बसतो मेळ
आयुष्याच्या रमल खुणांचा असा रंगतो खेळ
आदि अंत न ह्या खेळाला नकळे खोली उंची
करी प्रार्थना मनी निरंतर चिन्मय जगदीशाची
परमेशाची रूपे आगळी नाना रूपे दिसतो
शोधाशीस त्या काष्ठी पाषाणी तव अंतरंगी तो वसतो