Friday, August 8, 2014

देव टाक्यांचे पाणी


प्रिय जनहो ,mitrancheramayan.blogspot.com
आज. आपण सर्व  एका जण सुख सोहळ्याला  जमलो आहोत ,आणी AASTRID   माझ्या सर्व सहकाऱ्यांनी  ह्याचे आयोजन केले आहेत हि एक विशेष बाब आहे .  विशेष म्हणायचे ह्या साठी कि ह्या सुख सोहळ्याची जराही कुणकुण   उत्सव मूर्तीला    लागू देता हा आनंदोत्सव संपन्न होत आहे आणि आस्त्रीद च्या दृष्टीने हि आश्चर्यजनक बाब आहे,कारण पारदर्शी व्यवहार हे जणू ह्यांचे बोध वाक्यच आहे आणी यशाचे गमक ही
एक म्हण आहे कि उत्तम शेती,मध्यम व्यापार आणि  कनिष्ट नोकरी ,काही वर्ष पूर्वी आपला मराठी समाज हे विसरला आणी तेव्हाची आमची तरुणाई नोकरीच्या मागे लागली ,आणि समाजाच्या तरुण कर्तृत्वाला नोकरी पेशा आवडू लागला ,बाबू बनून खाबु व्हायची स्वप्न मराठी तरुणाईला दिवसा उजेडी पडू  लागली ,ह्या स्वप्नांनीच मर्द मराठ्याला कारकुनी  पेशात जोखडले आणी कारकुनाची एक पलटण व्यापार उदीम करणाऱ्या धाडसी  तरुणांना वेडगळ आणी अविचारी समजू लागली ,महाराष्ट्रातल्या उद्यमी वृत्तीला जणू एक ग्रहणाच  लागू पाहत होते
तुकोबांच्या एका अभंगात तुकोबा म्हणतात "मेळवोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे  वेच करी " चांगल्या व्यवहारांनी धन संचय करणे आणी " आणी कुठलाही लोभ  न करता व्यय करणे हा एक पुरषार्थ च आहे
स्वच्छ  आणि पारदर्शी  ह्या शब्दांना  व्यापारी  शब्द कोशात जणू जागाच नसते असा तक सार्वत्रिक गैर समज आहे  ,पण तुकोबांनी सांगितल्या प्रमाणे स्वच्छ आणि सचोटीने व्यापार करता येतो हे ज्या व्यापाऱ्यांनी दाखवून दिले त्या त आस्त्रीद कंपनी अग्रगण्य आहे .
ज़े पेराल ते उगवेल हाच निसर्गाचा न्याय आहे आणि तो सगळी कडे लागू होतो. सचोटीने केलेला व्यापार चांगलीच फळे देतो. आणि  हे शिकाव कोणाकडून तर आजच्या उत्सवमूर्ती कडून अथक परिश्रमाने ह्या तरुणाने एका व्यापारी संस्थेचे बीजारोपण केले  आणि त्याचा वेलू गगनंतरी पोहचला  आहे . श्री रवींद्र जगताप जे ह्या कंपनीचे नेतृत्व करतात त्यांच्या यशाचा आलेख थक्क करणारा आहे ह्या यशाची गुरुकिल्ली कोणती ,अनेक उत्तर येतील कोणी म्हणेल,नशीब,कोणी चलाखी म्हणेल काही नात्य्गोत्या चा विचार करतील  पण खरे कारण आहे तुकोबांच्या अभंगाचे तंतो तंत पालन
 आमच्या पंतप्रधानांनी एक नारा  दिला "सब कि साथ सबका विकास "पण हा संदेश जगताप साहेबांनी फार सुरवातीपासूनच अमलात आणला आपल्या सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन त्यांनी हा आस्त्रीद चा डाव मांडला आणि यशस्वीही केला सर्वश्री आशिष गिरप,सुबोध घैसास आणि गणेश केळकर ह्या आपल्या विश्वासू  सहकार्यांनी त्यांना मोलाची साथ दिली आणि अजूनही देताहेत ,ह्या कालखंडात बरेच लोक आलेही आणि गेलेही किंबहुना वैचारिक मतभेदाच्या नावाखाली त्यांना जावेही लागले ,असो पण जगताप साहेब मात्र  आपल्या वैचारिक मूल्यांपासून कधीही ढळले नाहीत आणि आपल्या स्वछ  आणि पारदर्शी व्यवहाराला विसरले नाहीत  त्यांच्या यशाचे गमक हेच.
वर्षे  त्याचे क्लीयारिंग  चे काम  आमच्याकडे होते ,आम्हा दोघाच्याही  व्यावसायिक जीवनातला तो एक सुवर्ण  काल होता ,बऱ्याचश्या  अविस्मरणीय  आठवणींच्या उबदार रमल खुणा सोडून वाटा वेगळ्या झाल्या पण मने नाहीत आयुष्यात ज्या मुल्यांची जपणूक आपण करतो त्या जपणारा दुसरा माणूस जेव्हा आपल्याला भेटतो तेव्हा वाटते जितं मया ,कारण ज्या विचारांना मी जपले ती जपान्यायोग्याच होती आहेत आणि भविष्यातही राहतील कारण सत्प्रवृत्ती हि काही कोणाची मिरासदारी आसत नाही आणि संपतही नाही गंगेच्या ओघा प्रमाणे ती सतत   राहील   आयुष्याच्या संध्याकाळी शांत पणे विचार करताना एक विचार मनाच्या पडद्यावर नकळत येतो कि जगताप साहेबांसारखे व्यक्तिमत्व तुला भेटले काही काळ तुम्ही बरोबर होतात काही कालच का असेना तुझे आयुष्य सोन्याचे झाले हे हि नसे  थोडके केवळ आणि केवळ वायानेच मोठा असल्याने प्राप्त झालेल्या निसर्गदत्त अधिकारांचे स्मरण करून आशीर्वाद देतो कि "जीवेत शरदः शतम"देव टाक्याच्या पाण्या सारखे स्वच्छ आणि निर्मळ मन असणाऱ्या ह्या माणसाला परमेश्वर उदंड  आणि निरोगी आयुष्य देवो हि प्रभू चरणी प्रार्थना करू माझे भाषण संपवतो .