Thursday, September 15, 2011

tanmay

चिरंजीव तन्मय'
रिकामटेकड्या लोकांबद्दल आलेला राग साहजिकच आहे,पण एक प्रेमाचा सल्ला देतो आहे,तू स्वताहून सतीचे वाण घेतले आहेस,तुझा मार्ग तू निवडला आहेस,
आणि ह्या मार्गावर तू इतका पुढे गेला आहेस कि आता माघार नाही,ह्या राग लोभाच्या फेऱ्यातून तुझ्या युयुत्सु आणि समाज प्रेमी भावनेने कधीचाच मुक्त
झाला आहेस ,तुझे कार्य फार मोलाचे आहे ज्यांना काहीही पडलेले नाही अश्या पडीक लोकांबद्दल विचार करण्याचे सोड बघूही नकोस,तुझी वैचारिक क्षमता आणि निरिच्छ वृत्ती ही तुझी देवदत्त कवच कुंडले आहेत
बाकी छोट्यामोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस,
शशांक रांगणेकर

शशांक रांगणेकर

Tuesday, September 13, 2011

parivartan

चिरंजीव तन्मय,
परिवर्तन सक्रीय राजकारणात जरूर उतरावे,नाहीतर काठावर बसून पोहणे शिकवण्या सारखे होईल
,परिवर्तन किती आणि कसे परिवर्तन करेल हे कालच ठरवेल पण "केल्याने होत आहेरे आधी केलेच पाहिजे"
हे नक्कीच ,ज्या पद्धतीने परिवर्तन काम करत आहे ह्यातून एक गोष्ट कळते की हातात परिवर्तनाची मशाल
घेऊन हा काफिला निघाला आहे ,नक्कीच वाटते की मंझील अब दूर नही,आयुष्याची संध्याकाळी तुमच्या पिढीसाठी
तुमचे निष्काम भावनेने चालेले कार्य पाहून फक्त वयाने आलेल्या मोठे पणाला स्मरून मनापासून आशिर्वचने येतात"
"शुभास्ते पंथानः सन्तु"
शशांक रांगणेकर