Sunday, January 8, 2012

श्रीश देशपांडे

पुंडलिका भेटी पर ब्रम्ह आलेगा"
चिरंजीव श्रीश देशपांडे रविवारी मला भेटायला माझ्या घरी आला ,भेटायचं आहे भेटायचं आहे म्हणता म्हणता आज तो योग आला श्रीश ला परमेश्वराला सात दिवसाच्या विश्रांती नंतर पडलेले स्वप्न असे मी म्हणतो ते तंतोतंत खरे आहे ह्याचा मला प्रत्यय आला ,शत प्रतिशत मातीतला माणूस,त्याच्या येण्याबरोबर एक सात्विक मृद्गंध आला ,सात्विक सोज्वळ आणि विनयशील स्वभावाची कवच कुंडले ल्यायालेला हा कर्ण माझ्या फाटक्या झोळीत निसर्ग विषयक ज्ञानाचे पसायदान कधी देऊन गेला ते कळल
सुद्धा नाही ,माझ्या सारख्या शहरी माणसाला निसर्ग नियमाची बरचशी कोडी सोडवून सांगता सांगता रानातल्या शिवारात घेऊन गेला ,हिरवाई उभी केली ,आणि निसर्गातला पांडुरंग शब्दात चितारून गेला ,माझ्या भेटीला आलेल्या त्या पांडुरंगाला विट हि द्यायची मला सुचले नाही ,वारकरी घराण्याची पताका सर्वार्थाने खांद्यावर घेऊन आलेलेल्या ह्या वारकऱ्याच्या दर्शनाने तुकोबांचा एक अभंग आठवला "शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी"
शशांक रांगणेकर