Monday, April 2, 2012

ढग आठवणीचे

ढग आठवणीचे मनी दाटता पाऊस वेळा येई
सुख शकुनाच्या मन मोराचा पंख फुलोरा फुलवी
मनी आठविता सल दुक्ख कळांचे काटा रुतून राही
भय दुक्खाच्या कंटक शल्ये विदीर्णता मनी येई
सुख दुक्खाच्या आठवणींचा कधी न बसतो मेळ
आयुष्याच्या रमल खुणांचा असा रंगतो खेळ
आदि अंत न ह्या खेळाला नकळे खोली उंची
करी प्रार्थना मनी निरंतर चिन्मय जगदीशाची
परमेशाची रूपे आगळी नाना रूपे दिसतो
शोधाशीस त्या काष्ठी पाषाणी तव अंतरंगी तो वसतो