Thursday, March 14, 2024

चिमणाळ,

-- आई तुला नातू झालाय मी आणि नीला थोड्याच दिवसात तुझ्या नातवाला घेऊन येतो
आहेत तुला दाखवायला  निलेश  बोलत होता फोनेवर ,तू कशी आहेस बरी आहेस ना
बर ठेवतो आता मग रात्री फोन करतो नीलच्या शब्दाने  विद्या हरखून
गेलली  काय बोलायचे ते त्यांच्या लक्षातच येईना ,आनंद मना मावत नव्हता
आणि डोळे अश्रूना थोपवू शकत नव्हते ,आनुताई  आहो अनुताई इथे या जरा "येते
येते म्हणून शेजारच्या ब्लॉक मधून आनुताई आल्या ,
अनुताई विद्याच्या शेजारी आज ३५ वर्षे आनुताई त्यांच्या शेजारी राहत
होत्या ,विद्या जेव्हा महेश बरोबर ह्या फ्लॅट मध्ये आली त्या  दिवसा पासून
आनुताई त्यांच्या शेजारी राहत होत्या ,आगदी सक्ख्या बहिणी सारख्या दोघी
राहत होत्या ,विद्द्यापेक्षा ते सात वर्षांनी मोठ्या असल्याने विद्या
त्यांना अनुताई म्हणत असे आणी त्यापण तिला अगंतुगं म्हणून  आपलेपणा दाखवत
असत ,
अनुताई आपल्या निलेशला  मुलगा झालाय तो आणि नीला बाळाला घेऊन इथे येताहेत
,
थोड्याच दिवसात ,"अगबाई देवी पावली तुला  देवी पुढे साखर ठेव. फारच
छान  झाले बायो ,आज आपला महेश असता तर माझ्या बाळाला बाळ  झालाय म्हणून
घरभर  नाचला असता .असो देवाच्या इच्छेपुढे आपण काय करणार, आठवणी शिवाय आणि
काय करू शकतो आपण डोळ्यांना पदर लावत अनुताई म्हणाल्या .
विद्याच्या  पुढे ३५ वर्षांचा सारा भूतकाळ उलगडला गेला .
विद्द्याचे महेशचे लग्न झाले तेव्हापासून अनुताई  आणि गणेशभावजी
त्यांच्या शेजारी राहत होते. विद्या च्या लग्नात अनुताई आणि गणेश भावजी
आले तेव्हा महेशने सांगितले  कि हे माझे सक्खे शेजारी आणि नातेवाईकही ,हि
मामी काग आई ?हो बाळा मामीही आणि मावशीही अनुताई कडेवरच्या चार
वर्षाच्या छोट्या मुलाला म्हणाल्या ,माधव नाव होत त्यास मुलाचे. माधव
मामी आवडली का ?हो हो आवडली ना लाजता माधव म्हणाला ,,आणि खरोखरच मामी
माधवला  फारच आवडली होती आणि ममीलाही माधव. माधव मामीकडे सतत असायचा
,
मामा आणि मामी त्याचे फार लाड पुरवायचे ,अनुताई तर म्हणायच्या कि माझा
मुलगा माझा कि तुझा हेच कळेनासं झालाय बघ ,विद्या  म्हणायची
आपल्यादोघांचाही आहे तो. लग्नानंतर वर्षभरातच विद्याला दिवस गेले.
अनुताईंनी विद्द्याचे डोहाळे पुरवले ,माहेरची आठवणही येत नव्हती विद्याला
,
विद्याच्या बाळंतपणात अनुताई तिच्या आई प्रमाणे तिच्या बरोबर होत्या
,
विद्याने एका गोंडस मुलाला जन्म दिला ,बारशाच्या दिवशी नाव ठेवायचा मान
नात्याचा म्हणून अनुताईने नाव ठेवले नील "आग तुझा माधव गोरा आहे अणे हा
छोटा थोडासासा सावळा म्हणून नील  दोघे मिळून नील माधव बरका ,अनुताई
म्हणाल्या ,बारश्याच्या बाळंतविडा  म्हणून बरे काही आणले होते पण एका
वस्तूने मात्र विद्द्याचे लक्ष वेधून घेतले ,पाळण्याला बांधायचे एक सुंदर
चिमणाळ, ,छोटा माधवही खुशीत होता आपल्याला भाऊ मिळाला म्हणून ,आता तो
,
मला दादा म्हणायला   सांग ना त्याला दादा म्हणायला  तो सारखा हट्ट करी
,
आणि विद्याकडे तक्रार करी. अरे अजून लहान आहे तो त्याला बोलता येत नाही
अजून विद्या त्याला समजावत असे, निल थोडा मोठा झाला आणि एक दिवस दददादा
असे बोलल्यावर  माधव खुश झाला आता आपण खरोखर मोठे  झाल्याचे त्याच्या
वागण्या बोलण्यातून दिसू लागले होते. दिवसांना पंख फुटले ,दोन्ही मुले
मोठी झाली माधव इंजिनियर झाला आणि निल डॉक्टर . दोनीही मुलांचे लग्न झाले
,
माधव मोठा इंजिनियर झाला ,आणि निल डॉक्टर ,दोघेही परदेशी गेले ,` अचानक
काही दिवसात छोट्याश्या आजाराने गणेशभावजी  वारले आणि  दोन वर्षांच्या
अवधीत महेशही . योगायोग म्हणायचं कि काय हेच  विद्याला कळात नव्हते
,
शेजारच्या घरात घडणाऱ्या सुख दुःखाची प्रतिमा आपल्या घरातही  उमटतात
ह्याची पक्की खात्री पटली  तिला ,आणि त्या खात्रीने ती फारच घाबरली होती
विद्या ,माधव आणि त्याची बायको आपल्या नवजात मुलाला घेऊन आले आणि येतानाच
 
ते तिच्या माहेरी गेले ,सगळे दुःख अपमान विसरून अनुताई सुनेच्या माहेरी
गेल्या आणि "आई आता आम्हाला इथेच राहावे लागेल कारण हिच्या आईला आताशा
बरे  नसते, त्यामुळे आम्हाला इथेच राहावे लागेल,तू ये कधी कधी आम्हाला
भेटायला इथे ,. अनुताईंनी सगळे दुःख मनातल्यामनात ठेवलेआता निल येतोय
आपल्या बायकोला आणि मुलाला घेऊन तो हि  बायकोचा माहेरी जाईल कारण नीलाही
आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती ,आणि तिची आईही एकटीच असायची .
मुख्यम्हणजे सुख दुःखाची घटना अनुताईंकडे घडायची त्याचे प्रतिबिंब
विद्याच्या घरी उमटायचे.
निल आणि निला मुलाला घेऊन घरी आले ,अनुताईंनी आणि विद्द्यानी बाळ
बाळंतिणीच्या ताबा घेतला ,अनुताईंनी बाळंतविदड्यात एक सुंदरसा लाकडी
पाळणा  दिला होता   आणि पाळण्याला लावायला एक सुंदरसे चिमणाळे ,जरीच्या
रंगी बेरंगीं चिमण्यांचे बनवलेले ते चिमणाळे ,फारच सुंदर दिसत होते
,
अनुताईंचा स्वभावच त्यातून दिसत होता सुंदर सरळ तरीही मोहक आणि प्रेमळ
,
जसे जसे दिवस जात होते तशी तशी विद्द्याच्या मनातली  आणि अस्वस्तता
वाढत होती ,हे नातवाचे सुख काही दिवसांपुरतेच आहे निल कधी परत जाईल आणि
परत आपण एकट्या राहू काही सांगता येत नाही.   ,  "आई एक  आनंदाची बातमी
आहे  अनु मावशीही बोलवून घे मी अर्ध्या तासातच घरी येतोय  नीलचा फोन आला
,
विद्याच्या मनातली दुराव्याची भीती उसळी  राहिली ,निल येऊन  मला सांगेल
 
आई मला नवी मोठी नोकरी मिळाली आहे आणि परत इंग्लंड नाहीतर अमेरिकेला
जायचे आहे ,आणि आपला एकटेपणाचा प्रवास परत चालू   होईल ,विद्याचे डोळे
पाण्यानी भरून गेले ,डोळ्यासमोर  झुलणारा अनुताईंचा पाळणा आणि त्याला
बांधलेले चिमणाळे  ,दिसेनासे झाले ,तिला वाटले कि निल सांगेल कि मी आता
परत जातोय आणि तेही मोठ्या पोस्टवर ,अनुताईंच्या घरी पडलेल्या
एकटेपणाच्या दुःखाचे प्रतिबिंब आता नेहमी प्रमाणे इथेही उमटेल.
दरवाजा वरची बेल जोरात वाजली ,अनुताई  आणि निल दोघंही एकदांनाच आत आले
,
विद्द्याचे पाय लटपटत होते ,आल्याआल्या एक पेढ्याचा पुडा  उघडून
देवाच्या समोर ठेवला आणि एक पेढा अनुताईंच्या हातावर ठेऊन त्यांना
नमस्कार केला, एक पेढा आईच्या तोंडात भरावला ,विद्याला पेढ्याची कडूझार
चव जाणवली आणि ती अक्षरशः  कोसळली , "आई आई काय झाले ,निल ने आईला सावरले
,
अनुताईंनी विद्याच्याचेहऱ्यावर पाणी शिंपडले ,काय झाला अनुताई
म्हणाल्या ,काही नाही  काही नाही कस ,विद्याला आडवून निल म्हणाला
बारश्याच्या दिवसापासून मी बघतोय मी तुझं कुठेही लक्ष नाहीय ,बाळालाही
निरखून बघत नाहीस तू ,कसलीतरी एक भीती मला तुझ्या डोळ्यात डोकावताना
दिसते ,आई खरे सांग हि भीती मी परत परदेशी जाईन ह्याची ना ,निल म्हणाला
विद्या ओक्सबोकसी रडू लागली ,त्या आवाजाने निला  पण जागी होऊन बाहेर आली
,"
आई आम्ही तुम्हाला आणि अनुताईंना सोडून कुठेही जाणार नाही आहोत इथेच
तुमचा नातू मोठा होणार आहे नीलाने सांगितले ,. डोळे पुसत पुसत विद्द्यानी
निल आणि नीलला जवळ घेतले ,पाळण्यातले बाळहि  जागे झाले होते एक टक  लावून
ते चिमणाळ्या  कडे  पाहत होते.  ,अरे तुझी आनंदाची  बातमी सांग ना नील
"
आई मी आणि नीलने आपल्या देशातच राहून हॉस्पिटल  काढायचे ठरवले आहे आणि
आज त्या च्या जागेचे करारपत्र झाले हीच ती बातमी ,पण ती ऐकायच्या  अगोदरच
तू घाबरलीस  आणि बेशुद्ध पडलीस ,आता बरी आहेस ना , होतर अगदी छान आहे मी
,
बारा हत्तीचे बळ आल्यासारखे  विद्या उभी राहिलीअनुताई चला गोडाधोडाचा
स्वयपांक करूया आणि सगळेच जण इथेच जेऊया ,उत्साहाने विद्या आणि अनुताई
स्वयंपाकाला लागल्या ,जेवताना चार घास जास्तीचे खाऊन दोघीही लवकरच
झोपल्या , चेहऱ्यावर समाधानाची साय पसरली होती आणि दोघींच्याही स्वप्नात
बाळाचा पाळणा  हालत होता आणि त्याला टांगलेल चिमणळ दिमाखाने गिरगिरात
होते.


शशांक रांगणेकर 






Saturday, June 10, 2017

Dole

http://maitrayan.blogspot.in/2012/01/dole.html?m=1

Thursday, December 17, 2015

योगेश मोरे



योगेश मोरे 

एक निरोप आला होता माझ्या साठी "माझ्यासाठी एक कविता प्लीज  "आणि मीही त्या हाकेला देऊन एक कविता पाठवलीही ,आणि आवडली असे नमूद करण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले, बस परिचय एवढाच , सहजच एक दिवस फोन वर बोलणे झाले आणि बोलता बोलता मला कळले मी एका योग्याशी बोलतोय  
हसऱ्या चेहऱ्याच्या एक चोविशीचा युवक मला आपल्या दुक्खाचे जराही भांडवल करता सांगतोय "तसे म्हणाल तर मी एकटा आहे माझे आई आणि वडील दोघेही नाहीत .पर दुक्ख शीतल म्हणतात पण इथे तर नुसत्या कल्पनेनेच त्याचे दुक्ख जाणवत होते ,आणि तो तर त्या दुक्खातून होरपळून निघाला होता ,तरीही एवढी स्तिथ प्रज्ञता कुठून आणली असेल ह्या युवकाने ,ज्या उमेदीच्या वयात आपले कर्तृत्व बघून पाठीवर प्रेमाचे हात फिरायचे तेच नाही,पण तरीही योगेश डगमगला नाही आपले आयुष्य स्वताच सावरायला पाहिजे हे समजून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले एका मोठ्या कंपनीत तो मोठ्या हुद्द्यावर आहे ,आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकां बरोबर अगदी सुखनैव राहतो आहे ,आयुष्यात कसलाही कडवटपणा नाही ,मित्रांना नातेवाईकांना मदत करतोय ,,योगेश खरोखर  hands ऑफ to you ,आत्म्याचे वर्णन केले आहे "नैनं छीदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः "तुला ते सर्वार्थाने लागू पडते ,सुख आणि दुक्ख एकाच निराकारी रूपाने तोलणार तो योगी ,नियतीलाही जो हार जात नाही तो योगी , योगेशच्या योगी रुपात नुसताच योगी दडलेला नाही तर एक आनंद यात्रीही वावरतो आहे ,त्याची रंगी बेरंगी वाल हि त्याची साक्ष , सुखाचे मोहर आणि दुक्खाचे काटे एकत्र जपणे फार कठीण ,ज्याला ते जमले त्याला सर्व काही उमगले ,योगेशच्या सांगण्यावरून केलेली कविता त्याच्यावरच केली गेली हे मलाही तेव्हा माहित नव्हते ,पण नियती काय खेळ खेळते ते परमेश्वरालाही माहित नसावे म्हणून तर म्हणतात "देवाघरचे ज्ञात कुणाला" योगेश तुला आशीर्वाद देण्याची सदिच्छा व्यक्तकरण्याची योग्यातही माझ्यात नाही ,इतका तू मोठा आहेस ,पण तुझ्या आनंदाला अदृष्टाची कधीही दृष्ट न लागो अशी ईश चरणी प्रार्थना करण्या एवढे बळ मात्र जरूर आहे. भविष्यात येणाऱ्या सुख दुक्खाच्य प्रवासात तुझे स्मरणही आश्वासक वाटेल  शब्द रचना चूक कि बरोबर माहित नाही पण तरीही दोन ओळी म्हणाव्याश्या वाटतात
                           " नश्वर मी ईश्वर तू योग्यातील तू योगेश
      नील पंखी मोरातील एकमात्र तू मयुरेश
      स्वरतीत ओंकार तू बुद्धी दाता तू गणेश
                              तव केवळ स्मरणाने हरपतिल  सर्व क्लेश 

   




शशांक रांगणेकर 
९८२१४५८६०२