Monday, September 3, 2012

हे जीवन सुंदर आहे..

हे जीवन सुंदर आहे..." चौकट राजा चित्रपटातलं मनात घर करून राहिलेलं हे गीत. आयुष्य सुंदर करायचं असेल तर कोणत्या ना कोणत्या छंदाचा हात हाती असायला हवा. छंद जोपासताना वयाच बंधन नसत. निसर्गाकडून मिळालेलं हे एक अद्भुत वरदान आहे.
       अद्वितीय रंगसंगती आणि अदाकारीने सर्वांना थक्क करणाऱ्या फुलपाखराला कोणी कधी निर्गंध, कोमेजलेल्या फुलावर भिरभिरताना पाहिलंय...? असाच एखाद फुलपाखरू आपल्याला दिसलं तर...? एक असच फुलपाखरी व्यक्तिमत्त्व जे एक आगळा छंद जोपासाताय....! "गुण गाईन आवडी...!" श्री.शशांक जी रांगणेकर...! एक चिरतरुण व्यक्तीमत्व....! कॉर्पोरेट क्षेत्रात बहुश्रुत असलेल्या रांगणेकर काकांची साहित्याशी जमलेली गट्टी पाहिली कि, वाचनशुन्य माझं मलाच लाजीरवाण वाटत. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकातील चांगल्या गुणांचं आवडीने गुणगान गाणं "मोठेपणा" याहून दुसर काय असू शकतो. फुलपाखरू प्रत्येक फुलातून मधु प्राशन करत भिरभिरत असत. हे फुलपाखरी व्यक्तिमत्त्व मात्र आपल्याठायी असलेल्या माधुर्याचा मुक्तहस्ताने वर्षाव करत कोमेजलेल्या फुलासही नवा तजेला देण्याच कार्य करत आहे.
       तुमच्या ठायी असलेल्या माधुर्याचा थेंब चाखण्याची संधी दिल्याबद्दल देवबाप्पाचे आभार. काका तुमच्या ह्या आगळ्या वेगळ्या छंदास साष्टांग नमस्कार...!

आपला,

सुरज उतेकर....!!

"मैत्रायण"

प्रिय जनहो
आयुष्यात चांगली माणसे भेटणे हा दैव(देव)योगच म्हणायचा,त्या देव योगाने आयुष्य संपन्न होत आलाय,"अंनंत हस्ते कमलाकराने ,देता किती घेशील दो कराने"हे नक्षत्रंचे देणे सांभाळून तरी कसे ठेवायचे आणि कुठे ,अमृतात पैजा जिंके अश्या माय बोलीचाच आसरा ,,मला भेटलेल्या ह्या सर्वसामान्य वाटणाऱ्या पण असमान्यात्वाची अदृश्य कवच कुंडले धारण करणाऱ्या ह्या मित्रांची मी रेखाटलेली वेडी वाकडी काहोईना चित्रे
तुमच्या पुढे सादर करण्याची मनोमन इच्छा ,साधन "मैत्रायण ""अपुरी शब्दसंपत्ती आणि अपुऱ्या प्रतिभेचा वारसा घेऊन येणाऱ्या ह्या संकल्पनेला फक्त तुमच्याच प्रेमाचा बुडत्याला काडी सारखा वाटणारा आधार ,तुमचा वाचनीय पाठींबा सदैव असो द्यावा .जिथे पु.ल.सारखी दैवत जन्माला येतात तिथल्या मातीलाही फुलांचा वास येतो हेच खरे,मग ते कोर्हन्तीचा का असेना ,मी अभिमानाने सांगतो कि मी पार्ल्याचा आहे ज्या पार्ल्याचे नाव पु ल.नि अजरामर केले ,माणसांनी माणसाचे देव गुण वर्णावे हा त्यांनी दिलेला वारसा ,त्याची जपणूक करण्याची केलेली एक केविलवाणी का होईना धडपड ,,"मैत्रायण"
शशांक रांगणेकर