Tuesday, August 28, 2012

दगडी फुल (प्रशांत जामदार)

दगडी फुल (प्रशांत जामदार)
मसाल्याच्या पदार्थात दगडी फुल नावाचा एक पदार्थ असतो,तुम्हाला माहित आहे कि नाही मला माहित नाही पण मला मात्र माहिती आहे ,मसाल्याचे पदार्थ करताना आई आवर्जून हे वापरायची ,दगडी फुल नावच किती वेगळे तरीही काव्यात्मक आहे दगड आणि फुले ,दगडाचा भक्कम पण आणि फुलांची नाजूकता अनुभवाची असेल तर "प्रशांत जामदार "ह्या कवीची कविता वाचावी अगदी "फुल और पत्थर "शब्द शब्दांना वेदनेचा पाझर फोडणारी प्रशांतची कविता ,मानवी अपप्रवृत्तीवर कोरडे ओढताना दिसते , "दारावर लाख सत्कार झाले पण आते ये कोणी म्हणालेच नाही "हे शब्द म्हणजे "सहन होत नाही आणि सांगता येत नाही "अश्या वेदनेची एक अव्यक्त सल,वेदनेला शब्दात पकडता येत नाही पण भावात प्रगट करता येते ह्याचे सादरीकरण करणारी हि कविता.
वर वर शांत दिसणाऱ्या ह्या प्रशांतच्या कवीमनात वेदनेचे किती लाव्हा उफाळतात आहे हे समजायचे असेल तर माणूस प्रशांत सारखाच दिलदार पाहिजे,
काही कवी शब्दांचे गुलाम असतात शब्दांची चाकरी करता करता भावांशी नाती सोडतात पण प्रशांत ची कविता मात्र अगदी प्रथम पुरशी एक वचनी त्याच्या पूर्ण कह्यात असणारी शब्दांना सांभाळत भावना फुलवणारी "घे एकवार नाव माझे "हि अशीच एक साध्या सोप्या शब्दातून कवीच्या भाव विश्वाचे आरस्पानी दर्शन करवणारी कविता ,
प्रशांत ची कविता हि माणुसकीचा चेहरा मोहरा घेऊन येते आणि म्हणूनच ती म्हणते "राहू दे असेच डोळे आसवांना घर असुदे .......
प्रशांतची कविता हि सर्वगामी आहे सुखादुक्खा बरोबर उंच उंच झोका घेणारी ,आणि तरीही वास्तवाची साथ न सोडणारी.दुक्खला कुरवाळ णारी आणि सुखाला फुलवणारी आशय घन कविता."प्रशांत समयी हा प्रशांत चा काव्य संग्रह असावा त्याची लिंक त्याने दिली तर वाचायला सुलभ होईल.
प्रशांत हा अभिनेता दिग्दर्शक अश्या सर्वच क्षेत्रात लीलया वावरतो आणि आपला ठसा उमटवतो आहे,
हे व्यक्तिमत्वच बहु आयामी आणि प्रगल्भ आहे ,आणि दगडी फुला सारखे .दगडासारखे अचल आणि फुलासारखे कोमल.
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२