Friday, February 17, 2012

मैत्रायाण

गुरुजींची आभाळ माया
धीरज
डोंगरे ,ठाणे शहरातला एक शहरातला एक सुशिक्षित नवयुवक ,सुखाने कुठेही नोकरी करून करत जगला असता पण काय करणार ,धीरजला दुर्बुद्धी सुचली आणि शिक्षण क्षेत्रातगेला
तेही कुठे एखाद्या मोठ्या उच्चभ्रू वस्तीतल्या शाळेत अथवा क्लास मध्ये गेला असता तर
धीरजचेच  नव्हे तर  चार पिढ्यांचे भले झाले असते ,कारण आजकाल शिक्षणाचा धंदा तेजीत आहे ,पण तो धंदा म्हणून केला तर ,व्रत म्हणून स्वीकारले तर परिणाम "धीरज डोंगरे"
अरेरे काय् हे  आपल्याच पायावर डोंगराएवढा धोंडा पाडून घेणारा हा धीरज दगडच असावा खरे आहे दगडच आहे तो मित्रानो साधासुधा नव्हे मैलाचा दगड .अहिक सुखाचे मार्ग शोधता खऱ्या सुखाचे मार्ग चोखाळणारा एक देवव्रत ,आदिवासी इलाख्यात जाऊन तिथल्या  मुलांना शिकवणारा ,माणूस बनवणारा एक देव्व्रती शिक्षक .धीरज शहापूरपासून कित्येक मैलांवर असलेल्या "बेलवली"नावाच्या गावात प्राथमिक शाळेत शिकवतो ,आदिवासी पाड्यात चालवल्या गेलेल्या शाळेत आणि शासनाच्या जाहिरातीत दिसणाऱ्या शाळेत किती तफावत असते हे वेगळे सांगायची  जरूरच नाही ,पण सत्यातल्या शाळा शासकीय जाहिरातीतातल्याच नव्हे तर त्याहूनही चांगल्या बनवण्याचा चंगच जणू त्याने बांधला आहे ,ग्रामीण भागात शाळा शिकवण्याला शाळा हाकणे असाही एक समानार्थी शब्द वापरला जातो सरकारी शाळांना चराऊ कुरण समजणारे काही पुण्यवंत शिकवण्याचा जोड धंदा करत करत ,आर्दश शिक्षक म्हणून प्रमाण पत्रके मिळवतात आणि बाकी आयुष्य त्यावर मिळणाऱ्या लाभांवर सुखनैव घालवतात.पण धीरज कुठल्या मातीचा बनला आहे परमेश्वरच जाणे,हा डोंगरा एवढा माणूस अक्षरशः माणसे घडवतोय , सर्व सामान्य मुलांना मिळणाऱ्या प्राथमिक सोईपासुनही वंचित असलेल्या आदिवासि मुलाना माणसात आणतोय , शिक्षणाचे महत्व काय आहे हे तर शिकवतो आहेच पण त्याहून जिकीरीचे काम म्हणजे त्यांच्या पालकांना त्यांच्या भविष्यासाठी शिक्षणाचे महत्वही पटवतो आहे ,आणि एवढे करूनही त्याचे वेतन एकाच मिळत असावे हाची मला खात्री आहे ते वेळेवर मिळते कि नाही  ह्याची मात्र खात्री नाही. धीरजच्या शब्दात सांगायचे झाले तर त्याचे विद्यार्थी कित्येक पटीने ती परत फेड करतात त्यांचा होणारा उत्कर्ष त्यांनी त्याच्यवर टाकलेला एक विश्वास आणि त्यांचा खडतर आयुष्यात धीरज मुळे उमटणारी "एखाधीच का होईना" स्मित रेषा, ह्या परताव्यावरती मला आभाळा एवढे सुख मिळते ..सुखाची तुम्हाम्हला कळणारी हि एक वेगळीच परिभाषा ,पण ती कळणारी एक संस्था ठाण्यात ठाण मांडून उभी आहे ,कित्येक सेवाभावी आणि पर्यटन प्रेमी युवकांची एक संस्था "दुर्ग सखा"दर्या डोंगरात फिरणारी आणि" मानवते एक एक पाऊल टाकणारी एक संस्था ,धीरजच्या आठवणीला पुण्यस्मरण म्हणावसे वाटते जिवंत व्यक्तीच्या स्मरणाला पुण्य शब्दाचे अमरत्व प्राप्त तेव्हाच होते जेव्हा ओठांवर शब्द येतात ,गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर ,गुरुर साक्षात परब्रम्ह तस्म्ये गुरवे नमः '
मास्तरला गुरुपद प्राप्त करून देण्याला माझ्या ह्या मित्राला माझे सादर प्रणाम
माझ्या मैत्रायाणातला हा  एक  गुरु चारित्री अद्ध्याय                  

Friday, February 3, 2012

आशीर्वाद 
उपासनेचे फळ कधी उशीराही  मिळते ,पण न मिळता राहत नाही, म्हणतात "भगवान के घर मे देर है अंधेर नही",आशीर्वाद मराठे ,एक मराठी  रंगकर्मी ,मध्यम वर्गीय घरातला एक होतकरू मुलगा हुशार कष्टाळू पण वेड्यात दौडले सात मराठी वीर ,त्यातला एक वेडा वीर वेड एकच माय मराठीची सेवा. ,
एक हुशार वकील पण ह्या वकिलांनी वकिली करायची ठरवली आहे मराठी रंगभूमीची ,त्याला साथ देतेय त्याची अर्धागिनी ,कर विषयक वकिली करता करता हा वकील नाटकही करतो,सिरीयल मध्ये काम करतो आणि स्वतःची पदरमोड करून संस्था हि चालवतो ,कोणीही god fathar नसलेला हा मर्द मराठा स्वतःच लढतोय आपली लढाई ,कोणाचाही पाठींबा नसलालेला आणि कामासाठी कुठलीही तडजोड करायला तयार नसलेला हा रंगकर्मी अजूनही विंगेतच उभा आहे,.
मराठी माणूस कुठे कमी पडतो ह्याचा विचार आपण केला पाहिजे "जाती साठी माती खावी म्हणतात  आम्हा सर्वांची जात एकच मराठी ,आपल्या मराठी लेबल मुळे जर एखादा मराठी माणूस दुर्लक्षित होत असेल ,तर ते थांबवले गेले पाहिजे ,कला गुणाने    संपन्न  असलेल्या  माणसाला फक्त नशिबाच्या लहरी झोक्यावर सोडणे म्हणजे मराठी रंगभूमीला मिळालेला शाप ठरेल.
जे मराठी रंगभूमीच्या सहाय्याने मोठे झाले आहेत दूरचित्रवाणीच्या योगे प्रसिद्धीच्या झोतात येताहेत त्याचे एक देवदत्त कर्तव्य आहे आशीर्वाद  सारख्या अष्टपैलू हिऱ्यांना प्रसिद्धीच्या कोंदणात  बसावा आणि म्हणा "एक मेक
सह्या करू अवघे धरू सुपंथ "
शशांक रांगणेकर

Wednesday, February 1, 2012

समाधान

चिरंजीव अजय,
तुझ्या वाल वरचे भावलेले एक वाक्य doing very good.. beyond my expectations !!! Tell your's.. how r u doing? :)समाधान हि एक प्रकारची योग साधनाच आहे दुध तापवल्या नंतर आणि निवल्यावर जशी साय साचते तसे परिश्रमाचे चटके खाऊन आता समाधानाची साय पसरली आहे,i m a simple & straight forward person with a little inclination towards spirituality.
 हे तुझ्या वाल वरचे वाक्य शत प्रतिशत सत्य आहे ज्याला समाधान गवसले त्याला आत्मा गवसला ,आत्मज्ञान प्राप्त झाले,तुझ्यासारख्या समाधानी  डॉक्टर ने पाणी दिले तरी त्याला औषधाचे गुण प्राप्त होतील.समाधानाचे उद्गार हि देवाला त्यांनी सुखी ठेवलाय असे सांगणारी एक पावतीच."औषधं जान्हवी तोयं वैद्यो नारायणं हरी "
शशांक रांगणेकर