Tuesday, January 31, 2012

satrangi

प्रिय जनहो
आपल्या अजयचा सतरंगी रे हा चित्रपट काहीच दिवसात प्रदर्शित होईल ,अजय नाईक एक साधासुधा मराठी मुलगा ,आपली सुखाची नोकरी सोडून चित्रपट निर्मितीत उतरला आहे ,एक स्वच्छ साधे मराठी जग आणि तरुणाई चे सप्त रंग त्यांनी ह्यात रंगवले आहेत,माझ्या फेस बुक च्या सर्व मित्रांना एक विनंती आहे कि सर्व मराठी जनानी ह्या आपल्या अजयच्या सतरंगी ला मनापासून पाठींबा द्या , त्यला आणि त्याच्या टीम ला तुमच्या शुभेच्छ...ा ची नितांत गरज आहे ,फेस बुक वरच्या सर्व तरुणाईला बुजुर्गांना विचारवंताना साहित्यिकांना कळकळीची विनंती की आज मनात पक्का विचार करा की आम्ही हा बोलपट चित्रपट गृहात जाऊन बघू ,माझे फेस बुक चे जेष्ट सदस्य श्री दत्ताजी सराफ ह्यांना कळकळची विनंती कि त्यांनी अजयला व सतरंगी च्या टीम ला हार्दिक आशीर्वाद द्यावेत ,एक मराठी मुलगा चांगले काम करतोय त्याचा पहिलाच चित्रपट आहे तोही शत प्रती शत स्वच्छ मराठी चित्रपट ,दत्ताजी तुमचे आशीर्वाद अजयकडे पोहचू द्यात,"फेस बुक च्या माझ्या मित्रानो
आजच अजयच्या वाल वर जाऊन त्याला दिलासा द्या कि अजय सतरंगी आमचा चित्रपट आहे म्हणून किमान एकदा तरी आम्ही तो चित्रपट गृहात जाऊन बघ.कारण आम्ही सर्व मराठी आहोत.
 

शशांक रांगणेकर 
९८२१४५८६०२

Monday, January 30, 2012

dole

डोळे म्हणजे मनाच्या दोन खिडक्या ,शब्दाने व्यक्त न करता येणारे भाव व्यक्त करण्या साठी माणसाला मिळालेले एक अस्पर्श वरदान ,कधी कधी नियती काही जणांच्या बाबतीत उजवे दान टाकते ,अतिशय बोलके आणि प्रभावी डोळे बहाल करते ,असेच बोलके आणि प्रभावी डोळे फेस बुक वर सर्फ  करताना दिसले ,मालकाचे नाव आहे "Aastad  Sunita Pramod काळे"
 .प्रभावी अस्मान्ताचा वेध घेणारी" प्रथम पुरुषी एकवचनी "नजर "सिकंदर च्या  बाबतीत म्हणतात" तो आला त्याने पहिले आणि त्याने जिंकले"सिकंदर आपली प्रभावी नजर अस्तद  ला देऊन गेला असावा अये वाटावे असे डोळे मिळणे हे खरे तर नक्षत्रांचे देणे "
शशांक रांगणेकर
 .

Tuesday, January 24, 2012

जग बदलतंय माणूस बदलतोय

               दिनेश तळेकर
जग बदलतंय माणूस बदलतोय नेहमीची ओरड ,म्हणून मी सतत शोधात असतो बदलणारा माणूस ,पण मला मात्र तो भेटत नाही आहे ,मला भेटलेला माणूस अजूनही त्याची माणुसकीची सर्व कवच कुंडलं सांभाळून आहे,प्रत्यक्षात न भेटताही आपल्या प्रोफाईल  मधून भेटलेला आणि एक माणुसकीचा चेहरा मोहरा बाळगणारा एक नवयुवक "दिनेश तळेकर"प्रिय जनहो "तुम्हीही बघा त्याचे प्रोफाईल म्हणजे तुम्हालाही कळेल कि सहुदय माणूस कसा असतो,दिनेश जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती "जग हि तेच सत प्रवृर्तीचे संतही तसेच,मग काय बदलले आहे काहीच नाही,फक्त बदलला आहे तो त्यांचा पोशाख संत प्यांट शर्ट मध्ये भेटताहेत बदल ला आहे ते एवढाच.
शशांक रांगणेकर

Friday, January 20, 2012

Thursday, January 12, 2012

तुझा विसर न व्हावा "

"तुझा विसर न व्हावा "

स्मृतिचित्रे ,मराठी साहित्यातील एक अद्भुत कलाकृती ,सकस आणि कसदार साहित्याला स्वानुभवाच्या वेंनाच जन्माला घालू शकतात ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे "संपूर्ण स्मृति चित्रे ,आचार्य अत्र्यांनी

लक्ष्मि बाई टिळकांचा साहित्य लक्ष्मी  म्हणून यथोचित गौरव केला आहे ,मागील अर्ध शतकाचा सामाजिक इतिहास ह्या ग्रंथात उलगडला गेला आहे ,प्रतिकूल परिस्तिथी ने कुठल्याही शाळेत न गेलेल्या

ह्या साहित्य लक्ष्मिने आपल्या संवेदना शील मनाचे बोल इतक्या साध्या आणि सोप्या भाषेत मांडले आहेत त्याला मराठी साहित्यात तोड नाही,"सत्य हे कल्पने पेक्षा अधिक बोधक आणि रम्य असते

,म्हणूनच विस्मृतीच्या पडद्या आड ते कधीही पुसले जात नाही ,मराठी माणूस ,आणि साहित्य ह्या साहित्य लक्ष्मि ला कधीही विसरू शकणार नाही ,मराठी साहित्यातला हा एक मैलाचा दगड,ह्या साहित्य लक्ष्मिचे

पुण्या स्मरण करताना म्हणावेसे वाटते कि "तुझा विसर न व्हावा "

शशांक रांगणेकर

Wednesday, January 11, 2012

तुषार गीतये

निकोप आणि चपळ स्वस्थ शरीर हे विधात्याची देणगीच ,आणि त्याला जर निगर्वी मनाची साथ असेल तर सोन्याहून पिवळ ,परमेश्वराने हे नक्षत्राचे देणे देताना जराही हाथ आखडता न घेता "तुषारला"घडवले आहे ,एका मराठी मुलाचे कर्तृत्व पाहून आपण मराठी आहोत ह्याचा अभिमान वाटतो ,स्वकर्तुत्वाने आपल्या स्वतःच्या आयुष्याचे शिल्पस्वतःच घडवणारा हा एकलव्य ,जेव्हा व्यायाम करत असतो तेव्हा कळत की हा कुठचाही निहित कर्तव्य तन मन अर्पून करत असतो ,राष्ट्र गीताचे सूर कानावर पडताच उत्स्फूर्त रित्या उभा राहणारा हा तरुण पाहून वाटते की ह्या देशाचे भवितव्य ह्याच्या सारख्या मुलांच्या हातात सुरक्षित आहे
शशांक रांगणेकर  





             तुषार गीतये 

Sunday, January 8, 2012

श्रीश देशपांडे

पुंडलिका भेटी पर ब्रम्ह आलेगा"
चिरंजीव श्रीश देशपांडे रविवारी मला भेटायला माझ्या घरी आला ,भेटायचं आहे भेटायचं आहे म्हणता म्हणता आज तो योग आला श्रीश ला परमेश्वराला सात दिवसाच्या विश्रांती नंतर पडलेले स्वप्न असे मी म्हणतो ते तंतोतंत खरे आहे ह्याचा मला प्रत्यय आला ,शत प्रतिशत मातीतला माणूस,त्याच्या येण्याबरोबर एक सात्विक मृद्गंध आला ,सात्विक सोज्वळ आणि विनयशील स्वभावाची कवच कुंडले ल्यायालेला हा कर्ण माझ्या फाटक्या झोळीत निसर्ग विषयक ज्ञानाचे पसायदान कधी देऊन गेला ते कळल
सुद्धा नाही ,माझ्या सारख्या शहरी माणसाला निसर्ग नियमाची बरचशी कोडी सोडवून सांगता सांगता रानातल्या शिवारात घेऊन गेला ,हिरवाई उभी केली ,आणि निसर्गातला पांडुरंग शब्दात चितारून गेला ,माझ्या भेटीला आलेल्या त्या पांडुरंगाला विट हि द्यायची मला सुचले नाही ,वारकरी घराण्याची पताका सर्वार्थाने खांद्यावर घेऊन आलेलेल्या ह्या वारकऱ्याच्या दर्शनाने तुकोबांचा एक अभंग आठवला "शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी"
शशांक रांगणेकर

Saturday, January 7, 2012

TUSHAR JOSHI

चिरंजीव तुषार,
तुझी मित्रा वरची कविता वाचली,तुझ्या कवितेला काय म्हणावे शब्दच नव्हे तर भावही अपुरे पडतात,
शब्द किती प्रभावी असतात ह्याचे सादरीकरण म्हणजे तुझी कविता ,शब्द रचनेला पर्याय नाही ,तुला
कदाचित वाटत असेल कि मी फार स्तुती करतो म्हणून ,परमेश्वराच्या स्तुतीला स्तोत्र म्हणतात
मनुष्य हि परमेश्वराची अप्रतिम निर्मिती आहे अश्या निर्मितेचे गुण गायन करणे हे एक स्तोत्र आहे असे मला
वाटते म्हणून "गुण गाईन आवडी "या माझ्या ब्लोग वरून हे स्तोत्र पठन करणे मला जराही अयोग्य वाटत
नाही ,माणुसकीचा चेहरा मोहरा दाखवणारी तुझी कविता वाचकाच्या बोटाला धरून तुझ्या भाव विश्वात हळुवार
घेऊन जाते,फक्त आणि फक्त वयाने मोठा असल्याने मिळालेल्या आशीर्वाद देण्याचा अधिकार आठवून तुला
मनापासून आशीर्वाद देतो "चिरंजीव भव"
शशांक रांगणेकर

Tuesday, January 3, 2012

TUSHAR JOSHI

गुण गाईन आवडी

शब्द बापुडे केवळ वारा"ह्या कवी वाचनाला फोल ठरवत आपल्या शब्दाचे मयुरपंखी फुलोरे फुलवत त्यातूनच भाव विश्व निर्माण करणारा एक कवी,तुषार जोशी अचूक आणि थोडक्या तरीही आशयघन शब्दरचना करणारा हा कवी मराठी कवितेला पडलेल्या पहाट स्वप्ना सारखा भासतो,पण ह्याची कविता फक्त भावस्पर्शी "नाही तर वास्तवाचे भान ठेवत म्हणते" ती प्रश्ण होऊन उभी झाली माझ्या समोर पण मला त्याचे उत्तर होता आले नाही आता कितीतरी लोकांसाठी उत्तर झालो असलो तरीही, हा कवी नुसताच कवी नाही तर एक योद्धा हि आहे त्याची युयुत्सु वृत्ती ललकार ते कि "तेच तेच काय जगतेस साचा सोडून जग जरा प्रत्येक पानाचा वेगळा आकार प्रत्येक ढगाचा तोच प्रकार नीट पहा वेगळाच दिसेल गवताचा प्रत्येक तुरा वाट सोडून चालून बघ वेगळ वेगळ दिसेल जग वेगळं दिसून बघ जरा ... साचा सोडून जग जरा कुसुमाग्रज आणि केशवसुतांचा आशीर्वाद घेऊन बहरणाऱ्या ह्याच्या कवितेला आणि ह्यालाही हार्दिक शुभेच्छा

शशांक रांगणेकर
.