Tuesday, January 3, 2012

TUSHAR JOSHI

गुण गाईन आवडी

शब्द बापुडे केवळ वारा"ह्या कवी वाचनाला फोल ठरवत आपल्या शब्दाचे मयुरपंखी फुलोरे फुलवत त्यातूनच भाव विश्व निर्माण करणारा एक कवी,तुषार जोशी अचूक आणि थोडक्या तरीही आशयघन शब्दरचना करणारा हा कवी मराठी कवितेला पडलेल्या पहाट स्वप्ना सारखा भासतो,पण ह्याची कविता फक्त भावस्पर्शी "नाही तर वास्तवाचे भान ठेवत म्हणते" ती प्रश्ण होऊन उभी झाली माझ्या समोर पण मला त्याचे उत्तर होता आले नाही आता कितीतरी लोकांसाठी उत्तर झालो असलो तरीही, हा कवी नुसताच कवी नाही तर एक योद्धा हि आहे त्याची युयुत्सु वृत्ती ललकार ते कि "तेच तेच काय जगतेस साचा सोडून जग जरा प्रत्येक पानाचा वेगळा आकार प्रत्येक ढगाचा तोच प्रकार नीट पहा वेगळाच दिसेल गवताचा प्रत्येक तुरा वाट सोडून चालून बघ वेगळ वेगळ दिसेल जग वेगळं दिसून बघ जरा ... साचा सोडून जग जरा कुसुमाग्रज आणि केशवसुतांचा आशीर्वाद घेऊन बहरणाऱ्या ह्याच्या कवितेला आणि ह्यालाही हार्दिक शुभेच्छा

शशांक रांगणेकर
.

1 comment:

Tushar Joshi said...

शशांक जी,

तुम्ही तुमच्या ब्लाग वर माझी दखल घेतलीत त्याबद्दल आभार. माझ्या कविता तुम्हाला आवडल्या आणि त्या उद्धृत कराव्याश्या वाटल्या याचा मला आनंद आहे. माझ्या कविता तुम्हालाही आनंद देत राहोत आणि आवडत राहोत ही मनपूर्वक आशा आहे.

तुषार जोशी, नागपूर