Saturday, September 1, 2012

सद्सद बुद्धीचा रखवाल दार नीरद जकात दार


सद्सद बुद्धीचा रखवाल दार नीरद जकात दार
गोपाल कृष्ण आगरकर ह्यांचा उल्लेख महात्मा गांधी आदराने" माझ्या सद्सद विवेक बुद्धीचा रखवाल दार "असा करत. मराठी तरुणाई किती संस्कार क्षम आहे ह्याची उदाहरणे फेस बुक च्या वाल वर वाचायला मिळते तेव्हा समाधानाचा सुस्कारा सोडावासा वाटतो.समाजाच्या ,तरुणाई च्या शुचितेचे डोळ्यात तेल घालून राखण करण्याचे काम,वेळ प्रसंगी शाब्दिक कोरडे ओढण्याचे काम तरुणच करताहेत हि अशादाई बाब आहे.,
नीरद जकातदार हा असाच एक लेखक त्यांनी लिहिलेले दोन लेख माझ्या वाचनात आले ,त्याच्या गुरुवारचा टी वी वर प्रसारित होणारया मालीकांवराचा लेख हा असाच एक अभ्यास पूर्ण लेख.ह्या मालिका काय करू शकतात ह्याची चुणूक आपल्या लेखात मांडताना नीरद म्हणतो "समाजातील बहुतांश सर्व साधारण लोक अंधश्रद्धा ,भूत प्रेत,,अशा गोष्टींवर चटकन विश्वास ठेवतात आणि त्याच्या नदी लागून जीव देण्या घेण्या पर्यंत मजल मारतात.
टी वी ,सिनेमा ,नाटक हि अतिशय प्रभावी माध्यमे आहेत जनमानसावर ह्यांचा फार मोठा पगडा असतो,वृत्तपत्र ,पुस्तके पेक्षाही ह्यातून पसरले जाणारे विचार द्रुत गतीने पसरतात आणि आणि विश्वासली जातात,"ब्रेकिंग न्यूज "नावाखाली पसरवले जाणारे अर्ध सत्य जन सामन्यांच्या मनावर अधो रेखित होते.
बऱ्याच वाहिन्यांवर मालिका दाखवल्या जातात तिथे तर कहरच होतो ,सत्य आणि वास्तवाशी फारकत करूनच बहुतांश ह्या मालिका बनविल्या जातात ,अतिरंजित दृश्ये ,आणि हिंसा,दुराचार ,त्या दुराचाराचे नागडे समर्थन ,आणि पांचट विनोद हा ह्या मालिकांचा गाभा असतो,.अनैतिक संबध ,इर्षा,हिंसा ,ह्यांनीच आपले समाज जीवन भरले आहे का असा संशय निर्माण केला जातो. मराठी मालिकाही त्याच दिशेला चालल्या आहेत,काही मोजके अपवाद सोडता मराठी मालीकानाही हि कीड लागते आहे ,ह्या मालीकातले दुषित नाते संबंधाचे चित्रण अतिशय पोकळ आणि अवास्तव वादी पद्धतीने चित्रित केले जाते आहे,अनैतिक संबंध आणि संशय ह्यातून ओढून ताणून आणलेले नाट्य ,सगळेच खोटे.पण चित्रण इतके प्रभावी की जन सामान्यांना खरेच वाटावे ,.काही काही निर्माते प्रतिथ यश दिग्दर्शक ह्यात निपुण झाले आहेत त्यांचा भाव ह्याने वधारला आहे ,हे चित्रण भयावह आहे ,मराठी मनातल्या सोज्वळ कुलवधू च्या प्रतिमेला तडा देणारे आहे "माझा बाप कोण "अशी संशयाची सुई पैदा करणारे आहे ,स्त्री पुराषांच्या पवित्र नात्यांना नर मादीचे नाते ठरवणारे चित्रण होते आहे.,सवंग लोकप्रियता प्रसिद्धी आणि पैश्या साठी काहीही करू अश्या ह्या मालिका आणि त्यांचे निर्माते आणि दिग्दर्शक वागताहेत.आमचे समाज जीवन इतके प्रदूषित झाले आहेका , नक्कीच नाही , आमच्यातला वारकरी अजूनही जिवंत आहे आणि मला त्याचे दर्शन होते आहे ह्या तरुणाई तून ,नीरद सारखे तरुण अजूनही सजग आहेत ,अप्प्रवृतींशी लढायची हिम्मत दाखवताहेत ,विवेचनातून प्रबोधन हा त्यांचा मार्ग आहे,एक जागल्या जगते राहो म्हणून हाक देणारा ,व्यासंग ,भाषा,आणि विचार ह्याच्या जोरावर अपप्रवृत्तीवर जोरदार हल्ला करणारा तरुण,मन भरून येते .देवाचे उपकार मानावेसे वाटतात सांगावेसे वाटते देवा नीरद सारखे सुपुत्र ह्या मातीला द्यायला ह्या मातीने केलेला पुत्र कामेष्टी यज्ञ नक्कीच सफल झाला आहे.. धोक्याची घनता वाजवणारे नीरद सारखे सुपुत्र हेच ह्या समाजाला तारतील,अगदी देवा सारखे ,आणि म्हणतात ना"देव तरी त्याला कोण मारी ".अप्रवृती चा मुकाबला आपल्या वैचारिक सुदर्शन चक्राने करणाऱ्या नीरद च्या
कृष्ण रुपाला मैत्रायानाचे सदर प्रणाम .
शशांक रांगणेकर , मुंबई
९८२१४५८६०२