Monday, March 26, 2012

आषाढ स्य प्रथम दिवसे

  • आषाढ स्य प्रथम दिवसे यक्षराज कुबेराच्या शापाने यक्ष भूमीतून निश्कासित झाल्याने रामटेक
    पर्वतावर आपल्या प्रिय पत्नीला सोडून व्यतिथ मानाने राहणाऱ्या यक्षाने मेघाला आपला दूत बनवले आणि आणि त्याच्या प्रिय पत्नीला संदेश पाठवला ह्या संदेशाला एका महा काव्याचे रूप प्राप्त झाले मेघदूत एक अप्रतिम विरह काव्य .त्या शब्दात जेव्हा अंतरन्गीचे भाव दाटून आले आणि तेव्हाच त्याला अमरत्व प्राप्त झाले.शब्दांना जेव्हा भावांची साथ मिळते तेव्हाच त्यांना
    अमरत्व प्राप्त होत नाहीतर शब्द बापुडे केवळ वारा .उच्चारण संकलन ,आणि प्रगटीकरण ह्यासाठी शब्दांचाभावानुभव वगत असावा लागतो अथवा भाववीन शब्द म्हणजे प्रणाविना देह कलेवरा समान. शब्दात सुरांची गुंफण करून त्याची गाण्यात पारदर्शी सादरीकरणाची किमया करू शकतो तो खराकॉम्पोसेर ,आणि हि रमलविद्या अवगत असणाऱ्या वैदर्भीय कलाकराचे नाव आहे
    "
    सुबोध साठे ",.कवीच्या शब्दांना सूर आणि तालान मार्फत रसिकान कडे पोहचवणे हे सोपे काम नाही ,कवी .रसिक ह्यांच्या मधला हा जिवंत दुवा आणि हे सर्व करता करता अर्थ कडेही लक्ष द्यावे लागते,आणि त्यासाठी निकड असत रसिकांच्या आवडी निवडीच्या पराखेची .,कधी कधी वाटते किती कठीण काम हे प्रसवाच्या कळा काढायच्या सूर ताल आणि भावाचे भान राखत राखत गाण तयार करायचे आणि रसिकांपुढे पेश करताना इदं मम म्हणत कवीच्या नावाचे, मळवट
    भरून जायचे.बर्याच वेळा शब्दांच्या दुर्बोधतेत गुंतलेल्या भावना केवळ सूर आणि तालाच्या किमयेवर रसिकांच्या मनापर्यंत अचूक पोहचवणे हे सुबोधचे काम आणि ह्या कामात तो केवळ निपुण नाही तर निष्णात हि आहे शब्दांच्या अगोदर भावना तो अचूक ओळखतो ,त्याची शब्द सूर आणि स्वरांची जा ळी विणत विणत रसिक मनाला गाण्यात गुंतवतो .सुबोध खर्या अर्थाने कलाकार आहे ,चौसष्ठ कलांचे देणे जणू देवाकडून रूप आणि गुणाच्या बरोबरदो पर दो नाही तो चौसष्ट फ्री असा सौदा पटवून आला असावा ,गातोही ,अभिनयही करतो आणि संस्थाही चालवतो ,निर्मिती जणू पारिजताका ह्याच्या सान्निध्यात बहरत असते यक्षभूमीत विरही यक्षाने पुनः एकदा जन्म घेतला आहे कारण सुबोधच्या"मनी मेघ दाटून आले ह्या विराणीत तीच आर्तता आढळून येते"आणि ती आर्ततान ऐकून वाटते कि ह्याला परकाया प्रवेश विद्याही प्राप्त असावी नाहीतर.... अरुंधती... च्या सुखद सानिद्ध्यात हि एकलेपणाची विराणी कशी काय आळवतो, अष्ट पैलू व्यक्तिमत्व हे हे सुबोधाचे अर्थ पूर्ण शब्दांकन. त्याला अवगतनसलेली अशी कला नसावी.आत्म्याचे बळ गीतेत सांगितले आहे, नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहतिपावकः"श असाच आत्मस्वरूप असलेला सुबोध शारीरिक त्रासाला मोठ्या लीलयेने पार करू शकला पाठीचा दुखू लागलेलाकणा ह्याच्या आत्म बळा सारखाच ताठ राहिला केवळ ह्याच्या मानसिक बळावर आणिशारीरिक व्यायामावर . सुधृढ शरीर आणि निकोप मन हि ह्याची बलस्थाने नव नवीन कल्पनांना प्रत्यक्षात अर्थपूर्ण रित्या सदर करणे हेच आजच्या म्यानेज मेंट गुरुचा फंडा असतो ,ह्या बाबतीत सुबोध गुरूंचाही गुरु आहे , असमी band हि त्याची भन्नाट कल्पना सळसलत्या रक्ताच्या नवोदित कलाकारांना एकत्र करून तरुणाईलाआवडतील अश्या गाण्यांच्या विविध प्रकारचे सादरीकरण हि त्याची संकल्पना त्यांनी यशस्वी रित्या प्रत्यक्ष्यात उतरवली आहे , स्टार माझा आणि आय बी लोकमत सारख्या माध्यमांनी पण त्याच्या ह्या उपक्रमांची कौतुकास्पद दाखल घेतली आहे. जन्मदात्या वडिलांची आठवण आणि अभिमान मनोमन सांभाळण ऱ्या पुत्ररुपाला पाहून वाटते "पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा फडकतसे त्रिलोकी झेंडा" शारीरिक उंचीने मनाची खोली येतेच असे नाही ,शरीरानेही उंच असलेली माणसे कतृत्वात खुजी भासतात ,शारीरिक उंची बरोबर ह्या सहा फुटी तरुणाला कर्तृत्वाची उंची आणि खोलीही गाठता आली आहे ,. अरुंधती आणि सुरमयी हि ह्याच्या आयुष्याची अविभाज अंग ,सुबोध च्या खांद्याला खांदा लाऊन त्याची पत्नी अरुंधती हि बहरते आहे ,वस्तू शोभनाच्या अनेक कलागुणाचे प्रत्याकारी संकल्पान तिच्या नेतृत्वाखाली होते आहे , कवी कालीदासनी वर्णन केलेली हि गृहिणी आपली सचिवाची भूमिकाही प्रभावी रित्या पार पाडते आहे. काहीच दिवसापूर्वी सुबोधचे"मेघ दाटले "गाण्याच्या सुरेल ओळी कानावर आल्या आणि त्या नकळत घेऊन गेल्या रामगिरी वर त्या कालिदास कालीन यक्षाची विराणी ऐकवायला सुबोधच्या स्वरात. वैदर्भीय भूमीत परत उमटलेल्या ह्या पर्मेश्वारीय यक्ष गणला मैत्रायानाचे शुभेछापुर्वक अभिवादन
    ,