Friday, May 25, 2012

रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी

रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी

नाद स्वर आणि सूर ,शब्द ,परमेश्वरा ने माणसालानव्हे तर संपूर्ण जीव सृष्ठीला दिलेली एक अलोकिक देणगी ,आणि ह्या देणगीची आराधना किंवा उपासना करणारे कलाकार मग ते गायक असोत ,वादक असोत अथवा कवी किंवा चित्रकार ,सर्व परमेश्वराचे प्रेषित ,त्या प्रेषितांचे ह्या भू तलावारचे अस्तित्व हि ईश्वराच्या अस्तित्वाची जिवंत ओळख.नाद ब्राम्हची उपासना हे ईश्वरी उपासनेचे अनन्य रूप .
शब्द आणि सुरांबरोबर ताल नाद नसतील तर तर गायन अगदीच फिके वाटते ,गाण्या बरोबर तबला पेटीची साथ नसणे म्हणजे हळदी कुंकवा शिवायची सवाष्ण .शब्द आणि सुरांबरोबर गाण्यात पेटी आणि तबल्याचे मेहुण पाहिजेच पाहिजे आणि त्रिताल झपताल ह्यांची साथ नसेल तर सगळेच बेचव आणि अळणी.
कोंकण म्हणजे परशुराम भूमी ,तेज आणि रूप ह्याचे मनमोहक चित्रण कोंकण वासीयांच्या चित्रित होतेच.रूप तेज आणि गुणाचे संचित साथीला घेऊन येणारे एक गुणी व्यक्तिमत्व ."प्रसाद विलास पाध्ये
".प्रसाद एक तबला नवाझ आहे .नवाझ म्हणजे राजकुमार ,खरोखर राजकुमाराच सगळ्या गायकांना हवाहवासा वाटणारा,उदार दिलदार आणि आश्वासक. गायकाला साथ करताना स्वतःचे अस्तित्व दाखवत त्याच्या गाण्याला सांभाळणारा एक मित्र.
बऱ्याच वेळेला स्वतःचे मोठेपण गायकांना त्यांच्या कमजोर गायकीच्या कैचीत पकडून दाखवण्याची फार हौस असते पण प्रसाद नावाप्रमाणेच आहे सह कलाकाराला साथ करणारा एक ईश्वरीय प्रसाद भासणारा.मी ह्याला फाडला किंवा भाजून खाल्ला असा कधीही विचार न करणारा .
iit बुद्धिवंत आणि प्रज्ञावंत विध्यार्थ्यांचे माहेर घर.जणू विज्ञान आणि प्रज्ञा साठी साथीने पाणी भरतात.पवई येथील iit मध्ये प्रसाद तबला शिकवतो .कला आणि विज्ञानाचे मनोहर फ्युजन प्रसादने ह्या लहान वयातही अनेक दिग्गज कलाकारांना साथ दिली आहे .
पद्मजा फेणाणी ,अश्विनी भिडे,स्वीकार कट्टी पंडित उल्लाहास बापट ,श्रीरंग भावे सारख्या दिग्गज कलाकारांना साथ दिली आहे.
गुणाचे भांडार ,बोटांवर जणू प्रत्यक्ष शिव शंकराने . दिलेले नाद ब्रम्हाचे वरदान ,आणि रूप तर "रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी असे उद्गार आणणारे ,तरीही चेहऱ्यावर निरहंकारी प्रासादिकता विलसणारे भाव. हे तर खरोखरीचे नाक्षत्रांचेच देणे .
प्रसाद च्या वाल वर त्याचे अनेक फोटो लावलेले आहेत आणि काही निसर्ग चित्र णे हि लावलेली आहेत ,त्यातले एक छायाचित्रण आहे हिमालयातल्या डोंगर दरयांचे,आणि त्या पार्श्वभूमीवर उभारलेला प्रसाद ,मनात विचार बळावतात नाद्ब्राम्हचे रूप हि असेच असेल ना पाठच्या वृक्ष राजी सारखेच उत्तुंग आणि मनोहारी अगदी पाध्यांच्या प्रसाद सारखे.
प्रसाद कोकणचा आहे तिथल्या हापूस सारखाच गोड फक्त गोड नव्हे तर स्वताची एक वेगळीच चव सांगणारा अनोखी आणि आगळी वेगळीच शब्दही अपुरे पडणारी.
त्याच्या तबल्याचा नाद ऐकून म्हणावसे वाटते "आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा तबला वाजवतो "
रूप आणि गुणाचे मनोहारी संचित घेऊन आलेल्या ह्या नादब्रम्ह उपासकाला मैत्रायानाच्या हार्दिक शुभेच्छा
शशांक रांगणेकर


मुंबई ९८२१४५८६०२