Thursday, August 30, 2012

नीरद ची जकात

नीरद ची जकात
महाराष्ट्र वारकऱ्यांचा प्रदेश आहे ,"भक्ती भावाने विठुरायाचे नाव घेत घेत पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा हा प्रदेश आहे,तसाच "भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी काठी हाणू असे बजावणाऱ्या तुकोबांचा प्रदेश आहे ,इथल्या मातीला भोळा भाव माहिती आहे पण भोळसट भक्ती माहित नाही ,भक्ती आणि श्रद्धेला ज्ञानाची दिव्य दृष्टी ह्या मातीनेच दिली आहे ,इथला भूमिपुत्र सर्वार्थाने वारकरी आहे आनंदाने गात नाचत पंढरीला जाणारा मेणाहूनही मउ असणारा आणि वेळप्रसंगी धार्मिक आणि सामाजिक अपप्रवृत्तींवर बेशालक वार करणारा वारकरी,,
संताची नामावली तर विष्णू सहस्त्र नामा पेक्षाही मोठी ,डोळस भक्ती ची मुळे इथल्या मातीत घट्ट रुजली आहेत ,अंध श्रद्धा ,इथल्या मातीत रुजत नाही ,म्हणूनच ,संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम ,समर्थ रामदास ,संत नामदेव ,संत चोख मेळा,संत एकनाथ ,संत ज्ञान देव , ,संत जना बाई,मुक्ता बाई , आणि कित्येक संताने दिलेली ज्ञान दृष्टी अजूनही सुस्पष्ट आणि लखलखीत आहे ,,मराठी मनावर अनेक समाज सुधारकाने केलेलेले संस्कार शाबूत आहे , महात्मा फुले ,लोकहितवादी गोपाळराव देशमुख ,तेल्याताम्बोल्यांचे पुढारी लोकमान्य टिळक ,बाबासाहेब आंबेडकर ,न्यायमूर्ती रानडे,सार्वजनिक काका,शाहू महाराज,ह्यांची शिकवण अजूनही मराठी माणूस विसरला नाही ,"बहुजन हिताय बहु जन सुखाय "राज्यावर आलेली शिवमुद्रा अजूनही मराठी मनावरून पुसट झालेली नाही.
काही अभद्र घटना महाराष्ट्रात घडतात पण त्याचा समाचार घेणारे अर्वाचीन संत हि महाराष्ट्रात आहेत ,असाच एक वारकरी "नीरद जकातदारनीरद जकातदार ".
नागपूर च्या संत्र सारखे रसाळ रूप आणि वडा भाता सारखी चटपटीत लेखणी ,हा छोटा मुलगा इतके तर्क शुद्ध लिहितो कि भाषेला तोड नाही ,त्याच्या लेखातला एकही शब्द बदलण्याची हिम्मतही कोणाला होणार नाही.
तर्क शुद्ध विचार ,,विचारची सखोलता ,आणि अर्थशास्त्र ,समाज शास्त्र ,आणि वैचारिक सुस्पष्टते वर आधारित लेखन.आणि तेही अतिशय सभ्य आणि समंजस भाषेत,कसलाही आक्रस्ताळी पणा नसलेले विचार पूर्वक ठाम मते मांडणारेच नव्हे तर पटवणारे लेखन.वय आणि बुद्धी ह्याचा संबंध असोतोच असे नाही हे ठोक बजावून सांगणारे लेखन .
नीरद एक अर्वाचीन संताची भूमिका बजावतो आहे ,ज्याची प्रवृत्ती निरपेक्ष वृत्तीने समाज प्रबोधन करण्याची आहे तो संत.
ह्या लहान वयातही हे ईश्वरीय लेणे लाभते कसे ,उत्तर एकाच" शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी,
फक्त वयाने मोठा असल्याने मिळालेल्या निसर्ग दत्ता अधिकाराने नीरद ला अनेक आशीर्वाद खरे तर शुभेछाच ,आणि त्याला घडवणाऱ्या त्याच्या मत पित्यांना आणि गुरुजनांना मैत्रायानाचे सदर प्रणाम.
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२