Friday, August 31, 2012

गुंतता हृदय हे

गुंतता हृदय हे ,
र.स.प ची कविता वाचतो तेव्हा असाच वाटते ,कि ह्याच्या कवितेत आपण फार गुंतलो जातो,शब्द आणि भावांच्या मायाजालात असा गुंतवतो कि आत गेल्यावर बाहेर यायचे रस्तेच बंद ,ह्याच्या कवितेच्या बंदिशालेतले तुम्ही एक बंदीच,आणि ह्याच्या शब्दांची उबदार शेलारी ने तो बंदिवास नुसताच सुसह्य नव्हे तर हवा हवासा वाटतो,
ह्याच्या ब्लोग वर मी सफरीला गेलो तेव्हा कळले की हि आकाश गंगेची सफर आहे अगणित ताऱ्यांचे तेज सामावून हि आकाश गंगा लखलखते आहे ,हि अनंत आहे अगणित आहे ,गद्य पद्य ,चित्र ,साहित्याच्या आणि कवितेच्या सर्वांगानं स्पर्शून सुगंधित झाली आहे,नादोमय तेजोमय साहित्य च्या अगणित बुट्ट्या ची पैठणी नेसून आलेली कुल वधू च , जणू.
रसप ला परमेश्वराने कुठल्या मुशीतून घडवले आहे ते कदाचित तो हि विसरला असेल कारण तो असे चित्र तो कधीतरीच काढतो ,खरे तर काढू शकतो नाहीतर व्यंग चित्र काढणे हा नेहमीचा उद्योग.एखाद्या बाग्वानाने सर्वच प्रकारची झाडे लावावी आणि त्या सर्वच झाडांना रसरशीत फळे यावीत तशी रसप ची साहित्यकृती आहे ,काहीही उणे नाही.
हा नुसताच शब्दांचा डोंबारी नाही तर शब्द आणि भावाच्या कुमार संभावातून साहित्याची निर्मिती करणारा निर्माता आहे.
ह्याची प्रत्येक साहित्यकृती हा एक अमर्त्य चिंतनाचा एक साक्षात्कारी अनुभव,पण तो आनंदानुभव घ्यायला आपलीच झोळी फाटकी असता कामा नये नाही तर देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.
गोड कसे लागते,चाफ्याचा सुंगंध कसा असतो ह्याची मोज मापे अंकात मांडताच येत नाही ,हा अमृतानुभव आहे कुठल्याही मोजमापात बंदिस्त न करता येण्या जोगा ,हा ज्याचा त्यालाच घ्यावा लागतो ,रसप च्या साहित्याकृतीना मैत्रयाणाचे शुभाशीर्वाद
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२