Thursday, December 17, 2015

योगेश मोरे



योगेश मोरे 

एक निरोप आला होता माझ्या साठी "माझ्यासाठी एक कविता प्लीज  "आणि मीही त्या हाकेला देऊन एक कविता पाठवलीही ,आणि आवडली असे नमूद करण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले, बस परिचय एवढाच , सहजच एक दिवस फोन वर बोलणे झाले आणि बोलता बोलता मला कळले मी एका योग्याशी बोलतोय  
हसऱ्या चेहऱ्याच्या एक चोविशीचा युवक मला आपल्या दुक्खाचे जराही भांडवल करता सांगतोय "तसे म्हणाल तर मी एकटा आहे माझे आई आणि वडील दोघेही नाहीत .पर दुक्ख शीतल म्हणतात पण इथे तर नुसत्या कल्पनेनेच त्याचे दुक्ख जाणवत होते ,आणि तो तर त्या दुक्खातून होरपळून निघाला होता ,तरीही एवढी स्तिथ प्रज्ञता कुठून आणली असेल ह्या युवकाने ,ज्या उमेदीच्या वयात आपले कर्तृत्व बघून पाठीवर प्रेमाचे हात फिरायचे तेच नाही,पण तरीही योगेश डगमगला नाही आपले आयुष्य स्वताच सावरायला पाहिजे हे समजून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले एका मोठ्या कंपनीत तो मोठ्या हुद्द्यावर आहे ,आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकां बरोबर अगदी सुखनैव राहतो आहे ,आयुष्यात कसलाही कडवटपणा नाही ,मित्रांना नातेवाईकांना मदत करतोय ,,योगेश खरोखर  hands ऑफ to you ,आत्म्याचे वर्णन केले आहे "नैनं छीदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः "तुला ते सर्वार्थाने लागू पडते ,सुख आणि दुक्ख एकाच निराकारी रूपाने तोलणार तो योगी ,नियतीलाही जो हार जात नाही तो योगी , योगेशच्या योगी रुपात नुसताच योगी दडलेला नाही तर एक आनंद यात्रीही वावरतो आहे ,त्याची रंगी बेरंगी वाल हि त्याची साक्ष , सुखाचे मोहर आणि दुक्खाचे काटे एकत्र जपणे फार कठीण ,ज्याला ते जमले त्याला सर्व काही उमगले ,योगेशच्या सांगण्यावरून केलेली कविता त्याच्यावरच केली गेली हे मलाही तेव्हा माहित नव्हते ,पण नियती काय खेळ खेळते ते परमेश्वरालाही माहित नसावे म्हणून तर म्हणतात "देवाघरचे ज्ञात कुणाला" योगेश तुला आशीर्वाद देण्याची सदिच्छा व्यक्तकरण्याची योग्यातही माझ्यात नाही ,इतका तू मोठा आहेस ,पण तुझ्या आनंदाला अदृष्टाची कधीही दृष्ट न लागो अशी ईश चरणी प्रार्थना करण्या एवढे बळ मात्र जरूर आहे. भविष्यात येणाऱ्या सुख दुक्खाच्य प्रवासात तुझे स्मरणही आश्वासक वाटेल  शब्द रचना चूक कि बरोबर माहित नाही पण तरीही दोन ओळी म्हणाव्याश्या वाटतात
                           " नश्वर मी ईश्वर तू योग्यातील तू योगेश
      नील पंखी मोरातील एकमात्र तू मयुरेश
      स्वरतीत ओंकार तू बुद्धी दाता तू गणेश
                              तव केवळ स्मरणाने हरपतिल  सर्व क्लेश 

   




शशांक रांगणेकर 
९८२१४५८६०२