Monday, March 26, 2012

आषाढ स्य प्रथम दिवसे

  • आषाढ स्य प्रथम दिवसे यक्षराज कुबेराच्या शापाने यक्ष भूमीतून निश्कासित झाल्याने रामटेक
    पर्वतावर आपल्या प्रिय पत्नीला सोडून व्यतिथ मानाने राहणाऱ्या यक्षाने मेघाला आपला दूत बनवले आणि आणि त्याच्या प्रिय पत्नीला संदेश पाठवला ह्या संदेशाला एका महा काव्याचे रूप प्राप्त झाले मेघदूत एक अप्रतिम विरह काव्य .त्या शब्दात जेव्हा अंतरन्गीचे भाव दाटून आले आणि तेव्हाच त्याला अमरत्व प्राप्त झाले.शब्दांना जेव्हा भावांची साथ मिळते तेव्हाच त्यांना
    अमरत्व प्राप्त होत नाहीतर शब्द बापुडे केवळ वारा .उच्चारण संकलन ,आणि प्रगटीकरण ह्यासाठी शब्दांचाभावानुभव वगत असावा लागतो अथवा भाववीन शब्द म्हणजे प्रणाविना देह कलेवरा समान. शब्दात सुरांची गुंफण करून त्याची गाण्यात पारदर्शी सादरीकरणाची किमया करू शकतो तो खराकॉम्पोसेर ,आणि हि रमलविद्या अवगत असणाऱ्या वैदर्भीय कलाकराचे नाव आहे
    "
    सुबोध साठे ",.कवीच्या शब्दांना सूर आणि तालान मार्फत रसिकान कडे पोहचवणे हे सोपे काम नाही ,कवी .रसिक ह्यांच्या मधला हा जिवंत दुवा आणि हे सर्व करता करता अर्थ कडेही लक्ष द्यावे लागते,आणि त्यासाठी निकड असत रसिकांच्या आवडी निवडीच्या पराखेची .,कधी कधी वाटते किती कठीण काम हे प्रसवाच्या कळा काढायच्या सूर ताल आणि भावाचे भान राखत राखत गाण तयार करायचे आणि रसिकांपुढे पेश करताना इदं मम म्हणत कवीच्या नावाचे, मळवट
    भरून जायचे.बर्याच वेळा शब्दांच्या दुर्बोधतेत गुंतलेल्या भावना केवळ सूर आणि तालाच्या किमयेवर रसिकांच्या मनापर्यंत अचूक पोहचवणे हे सुबोधचे काम आणि ह्या कामात तो केवळ निपुण नाही तर निष्णात हि आहे शब्दांच्या अगोदर भावना तो अचूक ओळखतो ,त्याची शब्द सूर आणि स्वरांची जा ळी विणत विणत रसिक मनाला गाण्यात गुंतवतो .सुबोध खर्या अर्थाने कलाकार आहे ,चौसष्ठ कलांचे देणे जणू देवाकडून रूप आणि गुणाच्या बरोबरदो पर दो नाही तो चौसष्ट फ्री असा सौदा पटवून आला असावा ,गातोही ,अभिनयही करतो आणि संस्थाही चालवतो ,निर्मिती जणू पारिजताका ह्याच्या सान्निध्यात बहरत असते यक्षभूमीत विरही यक्षाने पुनः एकदा जन्म घेतला आहे कारण सुबोधच्या"मनी मेघ दाटून आले ह्या विराणीत तीच आर्तता आढळून येते"आणि ती आर्ततान ऐकून वाटते कि ह्याला परकाया प्रवेश विद्याही प्राप्त असावी नाहीतर.... अरुंधती... च्या सुखद सानिद्ध्यात हि एकलेपणाची विराणी कशी काय आळवतो, अष्ट पैलू व्यक्तिमत्व हे हे सुबोधाचे अर्थ पूर्ण शब्दांकन. त्याला अवगतनसलेली अशी कला नसावी.आत्म्याचे बळ गीतेत सांगितले आहे, नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहतिपावकः"श असाच आत्मस्वरूप असलेला सुबोध शारीरिक त्रासाला मोठ्या लीलयेने पार करू शकला पाठीचा दुखू लागलेलाकणा ह्याच्या आत्म बळा सारखाच ताठ राहिला केवळ ह्याच्या मानसिक बळावर आणिशारीरिक व्यायामावर . सुधृढ शरीर आणि निकोप मन हि ह्याची बलस्थाने नव नवीन कल्पनांना प्रत्यक्षात अर्थपूर्ण रित्या सदर करणे हेच आजच्या म्यानेज मेंट गुरुचा फंडा असतो ,ह्या बाबतीत सुबोध गुरूंचाही गुरु आहे , असमी band हि त्याची भन्नाट कल्पना सळसलत्या रक्ताच्या नवोदित कलाकारांना एकत्र करून तरुणाईलाआवडतील अश्या गाण्यांच्या विविध प्रकारचे सादरीकरण हि त्याची संकल्पना त्यांनी यशस्वी रित्या प्रत्यक्ष्यात उतरवली आहे , स्टार माझा आणि आय बी लोकमत सारख्या माध्यमांनी पण त्याच्या ह्या उपक्रमांची कौतुकास्पद दाखल घेतली आहे. जन्मदात्या वडिलांची आठवण आणि अभिमान मनोमन सांभाळण ऱ्या पुत्ररुपाला पाहून वाटते "पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा फडकतसे त्रिलोकी झेंडा" शारीरिक उंचीने मनाची खोली येतेच असे नाही ,शरीरानेही उंच असलेली माणसे कतृत्वात खुजी भासतात ,शारीरिक उंची बरोबर ह्या सहा फुटी तरुणाला कर्तृत्वाची उंची आणि खोलीही गाठता आली आहे ,. अरुंधती आणि सुरमयी हि ह्याच्या आयुष्याची अविभाज अंग ,सुबोध च्या खांद्याला खांदा लाऊन त्याची पत्नी अरुंधती हि बहरते आहे ,वस्तू शोभनाच्या अनेक कलागुणाचे प्रत्याकारी संकल्पान तिच्या नेतृत्वाखाली होते आहे , कवी कालीदासनी वर्णन केलेली हि गृहिणी आपली सचिवाची भूमिकाही प्रभावी रित्या पार पाडते आहे. काहीच दिवसापूर्वी सुबोधचे"मेघ दाटले "गाण्याच्या सुरेल ओळी कानावर आल्या आणि त्या नकळत घेऊन गेल्या रामगिरी वर त्या कालिदास कालीन यक्षाची विराणी ऐकवायला सुबोधच्या स्वरात. वैदर्भीय भूमीत परत उमटलेल्या ह्या पर्मेश्वारीय यक्ष गणला मैत्रायानाचे शुभेछापुर्वक अभिवादन
    ,

Wednesday, March 21, 2012

धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना

·


धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना
दुर्ग सख्या ने शहापूर जवळ बोर्द्ये ह्या आदिवासी टापूत मुलांसाठी शालेय पुस्तके आणि साहित्याचे वाटप प्रायोजित केले होते,डोंगरे गुरुजींच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी गुरुजींच्या इछाचेनुसार हा कार्यक्रम जुळून आला ,गुरुजी म्हणजे शतप्रतिशत गुरु ,गुरु कुलाची परंपरा ,डोंगरे गुरुजी नि शब्दशः जिवंत ठेवली आहे ,त्याची इच्छापण त्यांच्यासारखीच ,पेशाशी इमान राखणारी ,आपला वाढदिवशी कुठल्याही हाटेलात पार्टी न करता आदिवासी मुलाच्या आणि त्यांच्या पालकांच्या सानिद्ध्यात साजरा करणारा हा माणूस ऋषी तुल्य चा म्हणावा लागेल ,गाड्याबरोबर नळ्याचीही यात्रा न्याय प्रमाणे मी हि त्या यात्रेत सामील झालो ,,दुर्ग सख्याचे सर्व ढाणे वाघ ठाण्याहून ,शहापूरला आम्हाला भेटले ,अभिजित काळे,आमचा सर्वांचा लाडका मनु,राहुल बाजी ,राजगुरू ,आणि कित्येक ,तरुण तरुणीची सेना आसनगाव स्थानकावर अवतरली आणि त्या जागेला पुण्याभूमिचे स्वरूप प्राप्त झाले ,सगळ्यांची नावे सांगितली तर विष्णू सहस्त्र नामाचे पुण्य गाठीशी जमा होईल,, गुरुजींनी सर्व व्यवस्था इतकी चोख ठेवली होती कि तमाम सहल संयोजकांनी परमेश्वराचे आभार मानावे कि गुरुजी ने शिक्षकी पेशा स्वीकारून त्यांचा एक मोठा स्पर्धक दूर केला .
इतकी चोख व्यवस्था ,कुठेही कुरबुर नाही धुसफूस नाही कि कसलीही गैरव्यवस्था नाही .सगळेच नेटके आणि आनंदी वातावरण.
मी आणि फाटक सर (फक्त वयाच्या स्पर्धेत मी बाजी मारली आहे ज्ञानाच्या बाबतीत हा माझा मित्र "कोण तुझ सम सांग गुरुराया कैवारी मजला "भासतो "),बर्गे सर ,नेने सर ,वालावलकर सर अश्या अनेक बुजुर्गांची वयस्क सेना आणि आपल्या कन्याकुमारी बरोबर आलेले शिंद्यांचे मेहुण आणि सळसळ त्या दुर्ग सख्याच्या युवसेनेने हर हर महादेव म्हणत आदिवासी पाड्याकडे प्रस्थान केले.
परमेश्वर शुभ कार्याला आशीर्वाद देतो म्हणतात ,थोड्याच वेळात डोक्यावर जल कुंभ घेऊन सुहास्य वादनाने निघालेल्या ग्रामीण ललना आणि हरिभक्तीची भगवी पताका खांद्यावर वाहणाऱ्या भक्तांची एक सेना आमच्या समोरून गेली ,शकुनांची प्रचीती च जणू खुणावत होती .
थोड्याच वेळात आम्ही आदिवासी पाड्याच्या जवळ पोहचलो ,तेथून पुढील सर्व प्रवास पाई पाई करायचा होता ,साधारणतः तासभर चालत आल्यानंतर आम्ही पान लोट क्षेत्राजवळ पोहचलो ,निसर्ग कुबेरासाखी उधळण करत होता ,,पालाश,उंबर ,.सारख्या वृक्षांच्या सोबतीने ठुमकत ठुमकत निघालेली पायवाट ,आपल्या नवथर स्पर्शाने रोमांचित करणारी हिरवळ ,आपल्या उबदार किरणाने आभाळ माया पसरवणारे उन्ह आणि आमची सोयरी वनचरे बनून आमच्या भेटीला आलेले भारद्वाज पासून खंड्या पर्यंतचे पक्षी आणि लांबवर उडत जाणारी बगळ्यांची माळ,आणि आपल्या रंगसंगतीची रांगोळी पसरवणारी वनराजी ,,निशब्द मनाचा ओंकारी साक्षात कार ,सर्वच अवर्णनीय ,.
साधारण दहाएक मिनीटंचा प्रवास नावेतून करायचा होता ,,वल्हवत होडीतून झालेला हा पहिला प्रवास ,भितीतर वाटत होती तरीही सुखद आनंद हि वाहत होता जीवन आणि मृत्यू सीमा रेषा एकमेकांना स्पर्शात जात होत्या ,नकळत तुकोबांचा एक अभंग ओठावर आला
"तू आम्हा सोयरा सज्जन सांगाती/तुज लागी प्रीत चालों सदा
/तू माझा जिव्हाळा जीवाचा जिवलग /होसी अंतरंग अंतरीचा
तुका म्हणे सर्व गुणे तुझा दास /आवडे अभ्यास सदा तुझा /
निसर्गायानाचे ओजस्वी दर्शन,मन कृतार्थ झाले .
शरीराचा भार सांभाळत बोटीत बसलो खरा पण मन मनाला मात्र सांभाळता येत नव्हते ,मन तरंगत होते हेलकावे घेत होते ,मनाची दैवी शक्ती कळत होती ,मन शरीर बुद्धी जन्म मृत्यू सर्व शब्दांची खरोखरीची अनुभूती ,वेद घोष ऐकू येत होते ,शाळेत ऐकलेले श्लोक ,आयुष्यात भोगलेल्या सर्व सुखांची चव दुखाची अंधार छाया ,नावागाताची आगमने आणि परागातांची निर्वाण सारे सारे भूत आणि भविष्य वर्तमान खेळ मांडीयेला म्हणत म्हणत झिम्मा खेळत होते , निसर्गायानाच्या संजीवक स्पर्शाने मनोगतीला निर्विकार निराकार अस्पर्श्नीय केले ,केशवसुतांची एक कविता आठवली आणि त्यात सांगितलेल्या स्तिथी ची अनुभूतीही आली "हर्ष मावळे खेद निमाले ,कंटक शल्ये बोथटली ,मखमलीची लव वठली ,काय म्हणावे ह्या स्तीथीला झपूर्झा गडे झपूर्झा .प्रियजन एका किनाऱ्या वर प्रियजन दुसरया किनाऱ्यावर आणि मी मध्ये प्रीयाजानांबरोबर भूत भविष्याचे वर्तमानीय शब्दांकन .सागरा समान पाण लोट धरेला कवेत घेणारे आकाश ,हिरवाईची वेलबुट्टी सांभाळत खुलणारी वनराजी , निसर्गाचे अभूतपूर्व रूप आणि शरीर आणि मनाच्या रंध्रा रंध्रातून चैतन्याची ओळख सांगत बहरणारी वाऱ्याची शीतल झुळूक ,सर्वच अल्लाहादकरी.नावेताला प्रवास संपला ,नाव दुसर्या किनार्यला लागली ,परमेश्वराचे उपकार मनात जमिनीला पाय लावले


परत चरती चरतो भागः चालू ,साधारण अर्धा ते पाऊन तास चालत चालत एका छोट्याश्या आदिवासी पाड्याजवळ पोहचलो थोडावेळ सर्वजण तिथे विसावलो ,डोक्यावर तळपणारा chandaagni आणि पोटात भडकलेला जठराग्नी ,आणि स्भोवारचे खांडव वन ,सगलेश अचाट
तिथे विसावल्यावर कळले कि छायेत किती सुख असते ते ,उन्हाशिवाय क्सावालीचे महत्व काळात नाही हेच खरे .
आदिवासीचे एक छोटेसे घर आणि त्याच्या सावलीत बसलेले आम्ही प्यायालेलो दोन घोट पाणी ,सर्व अनुभव अगम्य ,जन्म मृत्यू ,,सुख दुक्ख ,संपदा विपदा ,आहेरे नाहीरे सर्व विरुद्धार्थी जोड्यांची पुरेपूर झालेली ओळख कृये दुर्गसखा

पाणी पिण्यासाठी म्हणून जिथे थांबलो होतो तिथे असलेलेले adivasinch घर नावाचे झोपडे कोणीही नसताना उघडेच होते ,भीतीचा लवलेशही तिथे दिसत नव्हता ,.विश्वासाची घोन्घाडी पांघरून अभ्यागताला सावली देण्यासाठी उभारलेले एक घरकुल ,माझे सिमेंट विटांचे कुलापा कोयान्द्यातल्या घराराची असुरक्षितता प्रकर्षाने आठवली
शहरी श्रीमंतीच्या गरिबीची लक्तर नकळत डोळ्यासमोर आली.
एक वृद्ध आदिवासी स्त्री तिथे बसली होती आणि आमच्या कडे विस्फारित डोळ्याने पाहत होती हे कुठून बरे आले असावेत चेहऱ्यावरच्या प्रश्नाला बगल देत देत आम्ही पुढे निघालो
दुर्ग
सख्या चे सर्व स्वयंसेवक ,डोंगरे गुरुजी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि डोंगरेवढा उत्साह आणि तेवढेच समान घेऊन आम्ही दोन वाताद्याबरोबर निघालो खडबडीत पाऊलवाट,घड्याळ्याचे न थांबणारे काटे आणि मी म्हणणारे उन आणि ह्या सर्वांवर मात करणारी दुर्दम्य इच्छाशक्ती प्रवास चालू ,वय आणि वजन ह्याच्या अधिकारावर मला बैलगाडीत बसवले गेले आमच्या पुण्यःवाचानाला लागलेला एक वजनदार पापी छेद.
बैल गाडीत बसताताना बैलांच्या डोळ्यातली करूणा बोचकारत होती ह्या जन्मीच्या पापांची झाड झडती पुढच्या जन्मी द्यावीच लागेल असे बजावून सांगणार्या त्या डोळ्यांना बघण्याचे सामर्थ्य माझ्यात नव्हते .
अखेर आम्ही आम्ही यज्ञ भूमीवर पोहचलो ,शाळा नावाचे एक झोपडे आणि त्यात शिकणारी आदिवासी मुले ,त्यांचे पालक आणि डोंगरे गुर्जीनासारख्या शिक्षकांची आभाळमाया ,सर्व अगम्य आणि अलोकिक ,,दुर्गासाख्याच्या तर्फे शालेय दफ्तरे आणि साड्यांचे वितरणन झाले ,डोंगरे सरांचे एक छोटेखानी भाषण झाले ,दुर्गासाख्यानी एका आदिवासी मुलीला दत्तक घेतले ,,छोट्या आदिवासी मुलांना सरांच्या वादादिवासानिमित्त्या ने केक दिला गेला ,,मुलांच्या चेहऱ्यावरची कृतज्ञता आणि सिरांच्या चेहऱ्यावरचा आनंद ,एक देव दुर्लभ दृश्य ,मनात विचार आले गुरुजी कुठून आणलेत हे मन आणि हि श्रीमंती नावानेच नाही तर क्र्तृत्वानेही तुम्ही डोंगर एवढेच उत्तुंग आहात आणि तुमचे हे सखे सोबती प्रत्येकाच्या नावाचे उच्चारण हि विष्णू सहस्त्र नामाचे पुण्या गाठीशी दैईल ,
अभिजित काळे , , . कोणाचे नवा घ्यावे खरोखर तेहत्तीस कोटी देवांची नवे ह्या नावातच सामावली आहेत ह्याची खात्री पटली ,ह्यांच्या नामस्मरणे पुण्ण्याच्या राशीच जमाव्यात ,अशी धृधड भावना मनाशी आकाराला येत होती ,
श्रीकृष्णाने आपले तोंड उघडे दाखवले तेव्हा यशोदेला विश्वरूप दिसले तोच सोहळा आम्हाला दिसत होता डोंगरे गुरुजीने दुर्ग्साख्यामार्फात आम्हाला विश्वारूपाचे दर्शन घडवले.
आमच्या भेटीला आलेल्या आदिवासी मुलांचे रूप पाहून वाटले पुंडलिका भेटी परब्रम्ह आले गा
ह्या सुखासोहायाच i सांगता सुरस आणि सुखद जेवणावळीत झाली आणि पेट भर गया फिर नियत नाही भरी अश्या अवस्तेत आम्ही पोहचलो , .आणि उदरभरण नोहे जाणिजे याज्ञाकर्मा करत एका यज्ञाची सांगता झाली
आयुष्यातली एक सुखद दुपार ,कृतकृत्य झालेली एक मनुष्य जन्माची राघववेळ.
तृप्ती ओसंडत होती ,माझ्यापेक्षा कित्येक दशकांनी लहान असणाऱ्या ह्या मुलांची यशोगाथा सांगता सांगता उन्हा थकल नव्हते थोडाफार शरीर मात्र थकले होते ,paraticha प्रवास सुरु झाला , पुन्हा निसर्गायानाचे विरत दर्शन आणि आसनगाव स्टेशनला पुनरागमन ,जड मानाने सगळ्यांचा निरोप घेतला ,काही तासांपूर्वी अनोळखी असलेल्यांची काही तासात पटलेल्या जन्माजान्मातारीच्या ओळखीची कवचकुंडले लेऊन मुंबईकडे प्रस्थान केले ,
घरी पोहचल्या पोहचता झोप लागली. समाधानाची shal पांघरून झोप कधी लागली ते कळले सुधा नाही,
स्वप्नात मात्र एक सोनेरी मुंगुस दिसले त्याचे अंग पुरण सोनेरी झाले होते "जितं मायाचे भाव चेहऱ्यावर विराजत होते ,महाभारतातल्या राज्सुय्याज्ञात पडलेल्या उश्त्यात लोळून आल्या नंतरही अर्धे अंगाच सोनेरी झालेले अंग दुर्ग्साख्याच्या जेवणावळीत लोळल्याल्यानंतर मात्र पूर्ण सोनेरी झाले होते.

कुशल देशपांडे


मराठी तरुणाई चे वर्णन करायचे असेल तर कुशल च्या शब्दात करता येईल "मी बेपर्वा एक रंगेल मस्त कलंदर"आणि मराठी युवक असाच पाहिजे कुशल सारखा ,त्याची देहबोलीच सांगते हा युवक एक शत प्रतिशत मराठी तरुण आहे ,मराठी समाजाला अश्या जिवंत सळसळ त्या रक्ताची जरुरी आहे हा कलंदर आहे हा रंगेल आहे बेपर्वा हि आहे ,ह्याचे हे गुणविशेष त्याच्या भीतीवर तो प्रदर्शित करतो ,त्याला दुष्कार्मांचा राग तो "नागडे करून मारा"अश्या शब्दात प्रगट करतो आणि अनुरागाचे प्रगटीकरण करताना म्हणतो "खिलता रहे तू किसी गुलजार कि तरह,खुदा आबाद रखे,मेरे प्यार कि तरह ," आपल्या उत्स्फूर्त भावनाचे जराही उद्दात्तीकरण करता खोट्या शब्दांची आवरण घालता शब्दांकन करणे हे फक्त ह्याच्या सारख्या तरुणाला जमते कारण निर्भीडता ,"भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी काठी हाणू,अशी ह्याची वृत्ती आहे आणि अश्याच तरुणाची मराठी समाजाला जरुरी आहे ,तू म्हणतोस तू बेपर्वा आहेस नक्कीच कचकड्याच्या राग अनुरागांची ,तुला परवा नाही ,आयुष्यातल्या रंगात तू मस्त रंगतोस तरीही तुझे पाय मात्र जमिनीला लागुनच आहेत आणि आत्मविश्वास तुझ्या शब्द शब्दात झळकतो ,म्हणूनच म्हणतोस आयुष्यात कोणताच निर्णय चुकीचा नसतो मात्र घेतलेला निर्णय बरोबर आहे हे सिद्ध करावे लागते "कुशल तुझ्यातला आत्मविश्वास ,रंगेल कलंदरी आणि मनापासून शब्दातून व्यक्त होणारे समजा बद्दलचे उत्तर दायित्व ह्या गुणविशेषांचे वरण करायला भाव नाही पण शब्द जरूर अपुरे पडतात
अखेर तू आहेस तरी कसा मला पटलेल्या तुझ्याच शब्दात सांगायचे झाले तर "सतत गोड बोलून तुमच्या तोंडावर स्तुती करणारे अनेक असतील ,पण तुमच्या तोंडावर तुमच्या चुका सांगून टीका करणारे दुर्मिळ असतात आणि भविष्यात तुमच्या पाठीशी उभे राहणारे तेच असतात त्यांना ओळखायला शिका कुशल इतक्या लहान वयातही तू हे जाणलयस ,आणि ठणकावून जगाला सांगतो आहेस.तुझ्यासारख्या तरुणांची मराठी समाजाला नक्कीच आवश्यकता आहे ,तुझ्यासारखे तरुण महाराष्ट्र परत उभारतील ज्या महाराष्ट्राला बघून देश परत म्हणेल सेनापती बापट ह्याच्या शब्दात "महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले महाराष्ट्रविना राष्ट्र गाडा चाले"
कुशल तुझ्यासारखेच तरुण हे कार्य परत करतील ह्याबद्दल शंकाच नाही .
शशांक रांगणेकर