Wednesday, March 21, 2012

कुशल देशपांडे


मराठी तरुणाई चे वर्णन करायचे असेल तर कुशल च्या शब्दात करता येईल "मी बेपर्वा एक रंगेल मस्त कलंदर"आणि मराठी युवक असाच पाहिजे कुशल सारखा ,त्याची देहबोलीच सांगते हा युवक एक शत प्रतिशत मराठी तरुण आहे ,मराठी समाजाला अश्या जिवंत सळसळ त्या रक्ताची जरुरी आहे हा कलंदर आहे हा रंगेल आहे बेपर्वा हि आहे ,ह्याचे हे गुणविशेष त्याच्या भीतीवर तो प्रदर्शित करतो ,त्याला दुष्कार्मांचा राग तो "नागडे करून मारा"अश्या शब्दात प्रगट करतो आणि अनुरागाचे प्रगटीकरण करताना म्हणतो "खिलता रहे तू किसी गुलजार कि तरह,खुदा आबाद रखे,मेरे प्यार कि तरह ," आपल्या उत्स्फूर्त भावनाचे जराही उद्दात्तीकरण करता खोट्या शब्दांची आवरण घालता शब्दांकन करणे हे फक्त ह्याच्या सारख्या तरुणाला जमते कारण निर्भीडता ,"भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी काठी हाणू,अशी ह्याची वृत्ती आहे आणि अश्याच तरुणाची मराठी समाजाला जरुरी आहे ,तू म्हणतोस तू बेपर्वा आहेस नक्कीच कचकड्याच्या राग अनुरागांची ,तुला परवा नाही ,आयुष्यातल्या रंगात तू मस्त रंगतोस तरीही तुझे पाय मात्र जमिनीला लागुनच आहेत आणि आत्मविश्वास तुझ्या शब्द शब्दात झळकतो ,म्हणूनच म्हणतोस आयुष्यात कोणताच निर्णय चुकीचा नसतो मात्र घेतलेला निर्णय बरोबर आहे हे सिद्ध करावे लागते "कुशल तुझ्यातला आत्मविश्वास ,रंगेल कलंदरी आणि मनापासून शब्दातून व्यक्त होणारे समजा बद्दलचे उत्तर दायित्व ह्या गुणविशेषांचे वरण करायला भाव नाही पण शब्द जरूर अपुरे पडतात
अखेर तू आहेस तरी कसा मला पटलेल्या तुझ्याच शब्दात सांगायचे झाले तर "सतत गोड बोलून तुमच्या तोंडावर स्तुती करणारे अनेक असतील ,पण तुमच्या तोंडावर तुमच्या चुका सांगून टीका करणारे दुर्मिळ असतात आणि भविष्यात तुमच्या पाठीशी उभे राहणारे तेच असतात त्यांना ओळखायला शिका कुशल इतक्या लहान वयातही तू हे जाणलयस ,आणि ठणकावून जगाला सांगतो आहेस.तुझ्यासारख्या तरुणांची मराठी समाजाला नक्कीच आवश्यकता आहे ,तुझ्यासारखे तरुण महाराष्ट्र परत उभारतील ज्या महाराष्ट्राला बघून देश परत म्हणेल सेनापती बापट ह्याच्या शब्दात "महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले महाराष्ट्रविना राष्ट्र गाडा चाले"
कुशल तुझ्यासारखेच तरुण हे कार्य परत करतील ह्याबद्दल शंकाच नाही .
शशांक रांगणेकर

No comments: