Thursday, April 12, 2012

आनंद यात्री मी

आनंद यात्री मी नही मजला दुखाची पत्रास
मैलाचे हे दगड भेटतील जीवनात हमखास
त्या दगडांवर कोरीन शिल्पे गाईन अमृत गाणी
नको सावली पराभवाची कधी न गाई विराणी
त्या गाण्याचा सूर वेगळा कधीच गमला नाही
तव स्नेहाच्या किरण प्रकाशे काळ रात्र दूर होई
गातील दूत त्या रात्रीचे तेजाची गुण गाणी
 सरे आपदा नैराश्याची उमगता नारळातले पाणी
शशांक रांगणेकर

अगम्य तू अतर्क्य तू तुला नभात शोधतो अंधाऱ्या काळ रात्री मनात तू प्रकाशतो

अगम्य तू अतर्क्य तू तुला नभात शोधतो
अंधाऱ्या काळ रात्री मनात तू प्रकाशतो
कालिंदीच्या तटावरी बासुरीच्या सुरांवारी
वृन्दावनी गोकुळात राधेच्या आधारावरी
तू मलाच भासतो मी तुलाच पाहतो
पिउनी विष मीरेचे अंधत्व सुरदासाचे
विणाशी वस्त्र कबीराचे सख्य मैत्र पार्थाचे
नश्वर मी ईश्वर तू योग्यातील तू योगेश
नील पंखी मोरातील एकमात्र तू मयुरेश
स्वरतीत ओंकार तू बुद्धी दाता तू गणेश
तू मलाच भासतो मी तुलाच पाहतो
शशांक रांगणेकर
९८२१४५८६०२

ज्ञान अडीच अक्षरांचे

कान्हा गोकुळाची गौळण मी राधा
तुझ्या प्रेमाची झाली मला बाधा
भूत कसे उतरावे तुझिया प्रेमाचे
गुज मनातले कसे जनी लपायचे
प्रेमाच्या बाधेवर मिळेल का उतारा
प्रीत भावनेचा का लपेल हा पिसारा
कालिंदीच्या तीरावर पौर्णिमेच्या रात्री
ओसंडातील प्रणय रंग ओघळतील पात्री
सोडून बाध लज्जेचे होईन मी मुक्त
ज्ञान अडीच अक्षरांचे कळेल अद्द्वैत