Thursday, April 12, 2012

अगम्य तू अतर्क्य तू तुला नभात शोधतो अंधाऱ्या काळ रात्री मनात तू प्रकाशतो

अगम्य तू अतर्क्य तू तुला नभात शोधतो
अंधाऱ्या काळ रात्री मनात तू प्रकाशतो
कालिंदीच्या तटावरी बासुरीच्या सुरांवारी
वृन्दावनी गोकुळात राधेच्या आधारावरी
तू मलाच भासतो मी तुलाच पाहतो
पिउनी विष मीरेचे अंधत्व सुरदासाचे
विणाशी वस्त्र कबीराचे सख्य मैत्र पार्थाचे
नश्वर मी ईश्वर तू योग्यातील तू योगेश
नील पंखी मोरातील एकमात्र तू मयुरेश
स्वरतीत ओंकार तू बुद्धी दाता तू गणेश
तू मलाच भासतो मी तुलाच पाहतो
शशांक रांगणेकर
९८२१४५८६०२

No comments: