Wednesday, May 30, 2012

प्रसाद नामदेव चव्हाण

प्रसाद नामदेव चव्हाण
काही काही भेटी ह्या आयुष्यात ,योगायोगानेच होतात ,आणि ते योगायोग आयुष्यात बरचसे काही तरी देऊन जातात.नशीब माझ्यावर मेहरबान आहे ह्या बद्दल काही शंकाच नाही.नाहीतर माझ्या सारख्या अत्यंत सामान्य आणि सुमार माणसाला एवढी चांगली माणसे मित्र म्हणून का मिळवीत.उत्तर एकाच "खुदा देता है तो छप्पर फाडके देता है "मित्र म्हणून मला मिळालेल्या ह्या असंख्य व्यक्तींचे ऋण विसरावे म्हंटले तरी विसरू शकत नाही एवढे मोठे.त्यांच्या सुहृदतेचा झालेला सुवर्ण स्पर्श कायमचा ठसा उमटवणारा.

माझ्या मित्रपरिवारात मला काका म्हणून ओळखतात .पण वागतात जिवलग मित्रा सारखे. आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या आयुष्यातली नवी कोवळी उन्हे माझ्याशी शेअर करणारी हे तरुण वयातल्या अंतराचे भान दाखवत नाही पण विसरत हि नाहीत ,मैत्री आणि आदर एक सुरेख चित्रण ह्यांच्या वर्तनात नेहमीच जाणवते .नव्या पिढीचा मी शतशः ऋणी आहे.ह्या मित्रांच्या नामावलीतले एक तारांकित नाव "प्रसाद नामदेव चव्हाण ".

दुर्गा सखा संस्थेचा एक खंदा कार्यकर्ता ,आणि आमच्या मनूचा भाऊ ,चुलत भाऊ म्हणत नाही कारण प्रेम सख्या भावान पेक्ष्याही जास्त.नाते काय असावे किती असावे आणि कसे असावे ह्या सर्व ककारांचे समर्पक उत्तर .मनु दादा आणि प्रसाद म्हणजे आजचे राम लक्षमण ,दादाचे प्रसाद वरचे प्रेम आणि प्रसादला असलेला दादाचा अभिमान ह्याचे मनोहारी चित्रण नेहमीच दिसते.
प्रसाद हा उत्तम छाया चित्रण करतो ,छायाचित्रण चव्हाणांच्या रक्तातच आहे.पण प्रसाद नुसताच फोटो काढत नाही तर ते सजीवही करतोअशी ह्याची छायाचीत्रणे आहेत .
आजची पिढी काहीच वाचत नाही सुसंस्कृत नाही ह्या आक्षेपाचे उत्तर म्हणजे प्रसाद.साहित्य कविता इतिहास ,संत साहित्याचा अभ्यास ह्या सर्व अलंकाराने सालंकृत असलेले प्रसादचे व्यक्तिमत्व फारच लोभस आहे.
प्रसाद ची माझी भेट नुकतीच झाली आदिवासी पाड्याला जाताना तो आमच्या बरोबर होता खरे म्हणाल तर आम्ही त्याच्या बरोबर होतो ,निसर्गाचे अनादी आणि अनंत रूप आपल्या तृतीय नेत्रात तो सामावून घेत होता त्याच्या छाया चित्रणाची पोत काही वेगळीच निसर्गाशी जिवंत जवळीक साधणारी.एक प्रगल्भ कलाकारीची जाण असलेली .लहान वयातही मनाचा मोठेपणा दाखवणारी.पण तरीही तरल आणि सुगम.
आयुष्याचा सारीपाट खेळताना पडणारे प्रत्येक दान उजवच असेल असे नाही हे ज्याला उमगले तोच खरा ज्ञाता आणि जेता हि .प्रसाद मध्ये ह्या प्रासादिक गुणांना मैत्रयाणाच्या हार्दिक शुभेच्छा.
शशांक रांगणेकर
९८२१४५८६०२