Wednesday, January 11, 2012

तुषार गीतये

निकोप आणि चपळ स्वस्थ शरीर हे विधात्याची देणगीच ,आणि त्याला जर निगर्वी मनाची साथ असेल तर सोन्याहून पिवळ ,परमेश्वराने हे नक्षत्राचे देणे देताना जराही हाथ आखडता न घेता "तुषारला"घडवले आहे ,एका मराठी मुलाचे कर्तृत्व पाहून आपण मराठी आहोत ह्याचा अभिमान वाटतो ,स्वकर्तुत्वाने आपल्या स्वतःच्या आयुष्याचे शिल्पस्वतःच घडवणारा हा एकलव्य ,जेव्हा व्यायाम करत असतो तेव्हा कळत की हा कुठचाही निहित कर्तव्य तन मन अर्पून करत असतो ,राष्ट्र गीताचे सूर कानावर पडताच उत्स्फूर्त रित्या उभा राहणारा हा तरुण पाहून वाटते की ह्या देशाचे भवितव्य ह्याच्या सारख्या मुलांच्या हातात सुरक्षित आहे
शशांक रांगणेकर  





             तुषार गीतये 

Saturday, January 7, 2012

TUSHAR JOSHI

चिरंजीव तुषार,
तुझी मित्रा वरची कविता वाचली,तुझ्या कवितेला काय म्हणावे शब्दच नव्हे तर भावही अपुरे पडतात,
शब्द किती प्रभावी असतात ह्याचे सादरीकरण म्हणजे तुझी कविता ,शब्द रचनेला पर्याय नाही ,तुला
कदाचित वाटत असेल कि मी फार स्तुती करतो म्हणून ,परमेश्वराच्या स्तुतीला स्तोत्र म्हणतात
मनुष्य हि परमेश्वराची अप्रतिम निर्मिती आहे अश्या निर्मितेचे गुण गायन करणे हे एक स्तोत्र आहे असे मला
वाटते म्हणून "गुण गाईन आवडी "या माझ्या ब्लोग वरून हे स्तोत्र पठन करणे मला जराही अयोग्य वाटत
नाही ,माणुसकीचा चेहरा मोहरा दाखवणारी तुझी कविता वाचकाच्या बोटाला धरून तुझ्या भाव विश्वात हळुवार
घेऊन जाते,फक्त आणि फक्त वयाने मोठा असल्याने मिळालेल्या आशीर्वाद देण्याचा अधिकार आठवून तुला
मनापासून आशीर्वाद देतो "चिरंजीव भव"
शशांक रांगणेकर

Tuesday, January 3, 2012

TUSHAR JOSHI

गुण गाईन आवडी

शब्द बापुडे केवळ वारा"ह्या कवी वाचनाला फोल ठरवत आपल्या शब्दाचे मयुरपंखी फुलोरे फुलवत त्यातूनच भाव विश्व निर्माण करणारा एक कवी,तुषार जोशी अचूक आणि थोडक्या तरीही आशयघन शब्दरचना करणारा हा कवी मराठी कवितेला पडलेल्या पहाट स्वप्ना सारखा भासतो,पण ह्याची कविता फक्त भावस्पर्शी "नाही तर वास्तवाचे भान ठेवत म्हणते" ती प्रश्ण होऊन उभी झाली माझ्या समोर पण मला त्याचे उत्तर होता आले नाही आता कितीतरी लोकांसाठी उत्तर झालो असलो तरीही, हा कवी नुसताच कवी नाही तर एक योद्धा हि आहे त्याची युयुत्सु वृत्ती ललकार ते कि "तेच तेच काय जगतेस साचा सोडून जग जरा प्रत्येक पानाचा वेगळा आकार प्रत्येक ढगाचा तोच प्रकार नीट पहा वेगळाच दिसेल गवताचा प्रत्येक तुरा वाट सोडून चालून बघ वेगळ वेगळ दिसेल जग वेगळं दिसून बघ जरा ... साचा सोडून जग जरा कुसुमाग्रज आणि केशवसुतांचा आशीर्वाद घेऊन बहरणाऱ्या ह्याच्या कवितेला आणि ह्यालाही हार्दिक शुभेच्छा

शशांक रांगणेकर
.

Friday, December 23, 2011

prathamesh shirsat

गुण गाईन आवडी

केशवसुत,सुरेश भट,ग.दि.मा,grace ,गुरु ठाकूर,शान्ता शेळके,मराठी कवींची काही नावे,ज्यांच्या शब्दाने मराठी कवितेला कल्पनेच्या पंखांबरोबर वास्तवाचा मृदगंधहि बहाल केला,ह्या परंपरेला

साजेसलिहिणारा आणि एक "सायंतारा "मराठी काव्याच्या गगनात प्रकाशतो आहे '"प्रथमेश शिरसाट"वास्वाचे भान ठेवत शब्दाचा तरल फुलोरा फुलवत हा कवी जेव्हा म्हणतो"इथे कलेला किनारा नाही"

तेव्हाच कळत कि हाची कविता किती आशय घन आहे ,मनात उमटलेल्या वादळाला चित्रित करणारे ह्याचे शब्द जेव्हा मानवी मनाचे कंगोरे दाखवतात तेव्हा कळत कि खरोखर ह्याच्या काव्याला किनारा नाही

शशांक रांगणेकर

Thursday, December 22, 2011

satej padval

गुण गाईन आवडी
तरुण पिढी बिघडते आहे ,लहान मोठ्यांचा काही धरबंधच नाही ,जेष्ठांची ओरड ,कारण नसताना ,आजची पिढीही तेवढीच विनम्र आहे ,"सतेज पडवळ"नावाचा एक fb माझा मित्र आहे
वय वर्षे २१ अथवा २२ .बोलताना मला त्यांनी मित्रा म्हणून संबोधले ह्यांनी मी जेवढा सुखावलो त्यापेक्षा कितीतरी पटीने तो हळहळला,आपली एक अक्षम्य चूक झाली आहे असे त्याला
वाटते ,आणि हि चूक न चुकता त्यांनी करावी असे मला वाटते ,असो थोडक्यात सांगायचे कि आजची पिढीही आमच्या एवढीच सुशिक्षित विनम्र आणि सोज्वळ आहे ,आपल्या पाल्यावर
उत्तम संस्कार केल्याबद्दल त्याचे पालक आणि तो दोघेही अभिनंदनास पात्र आहेत.
शशांक रांगणेकर

vrukshavalli amha

वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे ,तुकोबांचा एक अभंग ,निसर्ग आणि मानवाचे अतूट नाते ह्या अभंगात सांगितले आहे ,ज्याला हे नाते कळले त्याला परमार्थ कळला ,निसर्गच माणसाचा गुरु ,"बंदगी तो
अपनी फितरत है खुदा हो न हो असे म्हणत अव्यक्त निर्गुण परमेश्वराचे व्यक्त रूप जे निसर्गात दिसते त्याची मानसपूजा करणारा माझा एक मित्र "श्रीश देशपांडे"त्याने नैसर्गिक सौंदर्याचे टिपलेले एक अप्रतिम छाया चित्र'निर्गुण परमेश्वराची सगुण रूपे दाखवणारा श्रीश हा खरोखरच सात दिवसाच्या विश्रांती नंतर परमेश्वरानी निर्मिलेली अप्रतीम कला कृति.

ajay naik

प्रिय जनहो,
,मराठीत एक म्हण आहे "जाती साठी माती खावी ",आणि आम्हा सर्व मराठी माणसांची एकच जात आहे ती म्हणजे मराठी ,आपल्या एका मराठी युवकाने एका
सिनेमाची निर्मिती केली आहे नाव आहे सतरंगी ,थोड्याच दिवसात तो प्रदर्शित होईल,आपली सुखाची नोकरी सोडून त्याने हे धाडस केले आहे,
मराठी कलाक्षेत्राची सेवाकारताना त्याला तुमच्या सहकाऱ्याची जरुरी आहे ,सतरंगी च्या यशाचे तुम्ही शिल्पकार ठरणार आहात ,सतरांगीला मनापासून
पाठींबा द्या ,चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पहा ,प्रश्नतुमचा हा चित्रपट आम्ही का पाहावा ? उत्तरहि तुमचेच "हा सिनेमा एका मराठी मुलाने काढला आहे "अजय नाईक" ने .
शशांक रांगणेकर