Wednesday, May 16, 2012

दिनेश पवार


दिनेश पवार
जीवन जगायची धारणा जो देतो तो धर्म,धर्माची हि व्याख्या सांगणारा एक धार्मिक मला फेस बुक वर सापडला ,आपल्या मनोगतात धर्म आणि त्या बद्दल आपले सुस्पष्ट विचार शब्दांकित करणारा एक युवक ,पशु पक्ष्यांवर मनापासून प्रेम करणारा एक पक्षीप्रेमी,
धर्म आणि जाती ह्यांच्यावर आधारित समाजकारण आणि राजकारण महाराष्ट्र भूमीत कधीच रुजले नाही
महाराष्ट्र भूमीचा धर्म सर्व जाती पंथ ह्यांना एकत्र ठेवणारा धर्म होता आणि आहे ,ज्ञानेश्वर ,तुकाराम नामदेव सावतामाळी ह्यांनी रुजवलेला वाढवलेला धर्म आहे. त्या धर्माचे नाव मानवता.मराठी साहित्यालाही धर्माचे वावडे नाही ,मुस्लीम धर्मीय संत कवी ,मराठीतले ख्रिस्त पुराण हि हि  मराठीची लाडकी अपत्ये.
शिवाजी हा महाराष्ट्राचा राजा होता ,महाराष्ट्रातल्या मुस्लीम बंधावानाही तो तितकाच प्रिय होता आणि आहे कारण शिवरायाच्या राजकारणाला जातीय अथवा धर्मांध राजकारणाचा रंग नव्हता त्याचा रंग भगवा होता एक शुचितेचा रंग ,विरक्तीचा रंग ,राजा हा जगाचा उपभोग शून्य स्वामी असतो ह्या तत्वांवर नितांत विश्वास असणारा राजा होता सर्व प्रजा हि समान लेकारासारखी असे समजणारा एक कुटुंब प्रमुख ,हा आपला तो परका अशी वृत्ती राजांच्या ठाई
नव्हती .जाती आणि धर्मापासून दूर राहणारे आणि सर्वांनाच सामावून घेणारे त्यांचे राजकारण होते ,म्हणूनच तत्कालीन समाजात सर्व जाती धर्मात शिवाजी राजे आमचा शिवाजी म्हणून लोकप्रिय होते मानवता ह्या एकाच तत्वावर शिवरायाचे राजकारण आधारित होते आणि त्यामुळेच त्यांची लोकप्रियता आजही सर्व धर्मीय जनमानसात टिकून आहे. धर्मांधतेची विषवल्ली ह्या मातीत कधीही रुजली नाही आणि रुजणार हि नाही.
इतिहासाची पुनरावृत्ती होते ,शाहीर अमर शेख ह्यांच्या सुकन्या सुश्री प्रेरणा अमरशेख ह्या आमच्या पार्ले महाविद्यालयात शिकत होत्या , फॉर्म भरताना जात आणि धर्म ह्या सदराखाली घातलेला "मानवता"हा शब्द बदलण्यास त्यांनी नकार दिला होता. गीता रहस्य लिहिणारे बाल गंगाधर टिळक तेल्या ताम्बोल्यांचे पुढारी म्हणून "लोकमान्य "होते .मानवतेचा मळवट भरलेले राजकारण आणि समाजकारण हीच मराठी माणसाची खरी ओळख .आणि आनंदाची गोष्ट म्हणजे एक मराठी युवक जो फार तर २४ /२५ वर्षाचा असेल तो ह्या तत्वज्ञानाचे समर्थन करतो आहे. दिनेश तुझ्या सारख्या तरुणांच्या हातातच महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित आहे मी दिनेश पवार ह्या व्यक्तीला व्यक्तीशः ओळखत नाही पण माझ्या ओळीखिचा आहे त्याचा मानव धर्म ,पशु पक्ष्यांवरचे त्याचे प्रेम ,उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवा म्हणून मनाला भिजवणारी हाक,आणि केवळ मनुष्य जातीवर नव्हे तर तुमच्या बरोबर ह्या वसुंधरेवर सह प्रवासी म्हणून आलेल्या सर्व सजीवांवर प्रेम करा आणि त्यांचाही जगण्याचा हक्क मान्य करा म्हणून केलेली एक कळकळीची विनंती.
दिनेश हे सूर्याचे नाव आहे अंधार संपतो प्रकाशाचे राज्य चालू होते समाजाच्या ,मनातला अंधार संपायला मानवतेचे प्रकाश किरण उगवावे लागतात ,आपल्या नावाला साजेसे काम करणाऱ्या दिनेश पवारला मैत्रायानाच्या हार्दिक शुभेच्छा
शशांक रांगणेकर


Thursday, May 10, 2012

विशाल महामुनी

रोहन मंकणी पुण्यातला मनसेचा एक युवा नेता ,
महाराष्ट्रातल्या आगामी राजकारणातला एक विन चा घोडा ,एक धडाडीचा युवा नेता ८०%समाज कारण आणि २०%राजकारण हि त्याच्या राजकारण करण्याची पद्दाथ असावी.
रोहन मधला सर्वात मोठा गुण म्हणजे आपल्या बरोबर कार्य कर्त्यांना तो सामील करून घेतो .हा कार्यकर्त्यांचा सहभाग रोहन आणि त्याच्या कार्यकर्त्यांना समाज सेवेचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध करून देत आहे ,गोवर्धन उचलायलाही कृष्णाने आपल्या सर्व गोपाल मित्रानाही सहभागी करून घेतले होते ,रोहनच्या राजकारणाचा बाज नेमका हाच आहे त्याचे राजकारण भाच्या पुताण्याचे नाही तर "महाराष्ट्र धर्म वाढवावा "ह्या साथ संगतीवर चालणारे राजकारण आहे. भविष्यातल्या पुण्याच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण करण्याची ती नांदी आहे .

नेत्याचे बळ त्यांच्या कार्यकर्त्यात असते हे महाराष्ट्रातले राजकारणी विसरले असावेत ,नाहीतर इम्पोर्टेड नेतृत्व आणि प्रादेशिक नेतृत्व असा कलगीतुरा नाचला नसता ,पण मला वाटते कि महाराष्ट्राच्या मातीत रुजणारे नेतृत्व उदयाला येते आहे आजची तरुणाई ह्या ८०"समाजकारण अनि२०%राजकारण करणाऱ्या ह्या नवी न युवा नेतृत्वाला पाठबळ देते आहे अगदी मनापासून साथ देताहेत .रोहन चा एक साथी "विशाल महामुनी"

नाव किती काव्यमय आहे न ,विशाल महामुनी "नावात काय आहे म्हणतात पण मला वाटते कधी कधी नियती नावातच सर्व काही ठेवते ,
विशाल हा ग्राफिक वेब डिझाय न र आहे ,तो त्याचा व्यवसाय आहे ,पण तो एक उत्तम छायाचित्रकारही आहे आणि तो त्याचा आवडता छंद आहे ,उत्तम छायाचित्रण हे मनाच्या संवेदन शिलतेचे द्योतक असते ,कुठे काय आणि केव्हा ,कसे अश्या क करांची छायाचित्रणात जाण आवश्यक असते ,ह्या लहान वयातही उत्तम छायाचित्रण करणे हा अनुभवाचा नव्हे तर भाग्याचाच भाग समजावा लागेल ,इतकी उत्तम छाया चित्रण कला त्याला अवगत आहे ,.
पुणे हि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ,विशाल सर्व सांस्कृतिक उपक्रमात सहभागी असतो ,,
पुण्याचा विकास सर्वांगाने व्हावा आणि त्यात आपला सहभाग असावा अशी मनापासून स्वप्ना पाहणाऱ्या आणि त्यासाठी मेहनत घेणाऱ्या युवकाची एक फळी उभिकारणाऱ्या रोहन चा विशाल बिनीचा शिलेदार आहे ,,रोहन विशाल सारखे तरुण जेव्हा आपल्या सर्व साथीदारांबरोबर मनापासून काम करतात तेव्हा विकासाची गंगा अवतीर्ण व्हायला वेळ लागत नाही ,"महाराष्ट्राला "महा राष्ट्र"करण्याचे स्वप्ना पाहणाऱ्या "रोहन विशाल आणि त्याच्या असंख्य सोबत्यांना मैत्रायाणाचा सलाम
शशांक रांगणेकर

Wednesday, May 2, 2012

प्रतिक म्हात्रे

निर्मल आणि निर्वाज्य हास्य हि निरोगी मनाची देणगी असते आणि निरोगी मन हि परमेश्वराची देणगी ,हि देणगी मिळालेला एक भाग्यवंत मला भेटला हाही भाग्याचाच भाग पण माझ्या .नाव "प्रतिक म्हात्रे"
हसताना दिलखुलास हसले तर कदाचित पोलीस पकडतील असे भाव मनात बाळगून हसणारे चेहरे मी बरेच बघितले आहेत पण काहीही हाताचे नठेवता जे हसरे चेहरे दिसतात त्यातला हा एक चेहरा .
मुखवटा धारण न करता मनापासून हसणारी माणसे खर्या अर्थाने परमेश्वराचे प्रेषित असतात ,त्याच्या कृपेचासंदेश  ते जगात पसरवतात ,
नियती नियतीचे काम करते पण परमेश्वर नियती कडे लढण्याचे बळ देतो ,ऐन शिक्षण काळात पित्याचे छात्र हिरवल्यानंतरही शिक्षण पूर्ण करून ,चांगली नोकरी हस्तगत करून लहान भावावर आणि कुटुंबावर आपल्या प्रेमाचे छत्र पसरवणे आणि तेही कोवळ्या वयात हे सोपे काम नाही ,आणि नियतीशी झगडता झगडता चेहऱ्यावर जराही कटुता न आणता सदैव स्मिताचे शरदाचे चांदणे फुलवणे ज्यांना जमते ते परमेश्वराच्या कृपेचे जिते जागते प्रतिक.
प्रतिक हा एका फायनान्स कंपनीत नोकरी करतो पण बाकी व्यवहारात मात्र जराही वाणिज्य वृत्ती नाही ,,दिलदार हसमुख आणि जीव भावाचा मित्र अशी त्याची छबी त्यच्या मित्रात उमटलेली आहे .
स्वतः सठी सुखाचे मार्ग शोधतो तो भोगी ,आणि दुसरयासाठी सुख शोधतो तो योगी ,मित्रांच्या प्रीयाजनाच्या सुखासाठी सदैव काही न काही कार्यमग्न राहावे हि ह्याची मनापासूनची ओढ ,.

प्रतिक खरा रसिक आहे मराठी नाटके चित्रपट पाहणे पुस्तके वाचणे ह्याची ह्याला आवड आहे .सापताहिक मासिके ह्यांच्या साठी लिखाण करणे आणि त्या dware मराठी प्रतिभावंत युवकाची ओळख करून देण्याची ह्यची एक अनोखी शैली युवा जगतात लोकप्रिय आहे आहे .
दुख्हाचे काळे शारढग पसरलेले असताही चेहऱ्यावर आनंदाचे शरद चांदणे फुलवणारा आणि दुसऱ्यान साठी सुखाचा मार्ग शोधणारा प्रतिक आणि त्याच्या चेहऱ्यावरचे चांदणे हि सुखाची अनुभूती.
कविता करतोस का ह्या माझ्या प्रश्नाला त्याचे उत्तर मला कविता जमत नाही ,ज्याचे आयुष्याच एक काव्य आहे त्याला वेगळी कविता ती कशाला पाहिजे दुक्खाच्या प्राहारा नंतरही ,सुखाचे सुरेल गाणे गाणारा प्रतिक हेपरमेश्वरी कृपेचे चालते बोलते प्रतिक .त्या प्रतीकला मैत्रायानाच्या अनेक शुभेच्छा
शशांक रांगणेकर
मुंबई ९८२१४५८६०२


Tuesday, April 17, 2012

मनोज रंधे



नटराज शंकर हे भारतीय संस्कृतीचे ऐक अविभाज्य अंग ,आणि नृत्यकला हे चौसष्ठ कलांपैकी ऐक श्रेष्ठ तम कला हा विश्वास..राधा आणि कृष्णाची रासलीला हा भारतीय समाजाचा आवडता परंपरागत नृत्यप्रकार ,
भारतीय साहित्त्यातले बराचेसे खंड ह्या दोन अनुभूतींच्या शब्दांकानात वर्णीत झाले आहेत ,हळद आणि कुंकू ह्या जोडी प्रमाणे गायन आणि नृत्य हि कलेची दोन्ही प्रकार हातात हात घालून येत ,गायन कले प्रमाणे नृत्यकलेलाही लोकाश्रय बरोबर राजाश्रय होता ,भारताच्या प्राचीन इतिहासापासून ब्रिटीश पूर्व इतिहास पर्यंत गायन कले एवढीच प्रतिष्ठा नृत्य कलेला होती .तन्जौअर ,केरळ,अवध येथील शासक नृत्यकलेचे केवळ आश्रय दातेच नव्हे तर उपसाकाही होते .
काळाच्या ओघात नृत्याकालेला ऐक गौण दर्जा प्राप्त झाला .ऐक गौण दर्जाची कला असे रूप प्राप्त होऊन नर्ताकाना  नाच्या ह्या शब्दात संबोधले जाऊ लागले ,ह्या कलेवर ऐक स्त्रैण छाप पडला तिचे शिव शंकरी रूप विलयास जाऊन ,लोककलांच्या वळचणीला जाऊन नाच्या रूप प्राप्त झाले नटेश्वराचे मराद्नी रूप जाऊन नाच्या चे क्लैब्यं कधी प्राप्त झाले ते कळले सुद्धा नाही

स्वातंत्रोत्तर काळा परत एकदा नृत्यकलेला प्रतिष्ठा प्राप्त होतेय ,भारत नात्याम ,कत्थक ,मणिपुरी अश्या अभिजात नृत्यप्रकारा बरोबर ,पोवाडे ताब्लो  नृत्य नाटिका अशा विविध संयुक्त कला प्रकारांना अभिजानाकडून हि लोकाश्रय मिळतो आहे ,नाच आणि नाच्या ह्या शब्दात प्रतीत होणारी हीन भावना जाऊन नृत्य आणि नर्तक अश्या प्रतिष्ठित संबोधनाची जोड मिळते आहे , अभिजानाचा लोकाश्रय आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळण्यासाठी "कित्येक गोपीकृष्ण ,पार्वती कुमार आणि बिरजू महाराजांचे अथक परिश्रम ह्या च्या मुळाशी आहेत , कलेला प्रादेशिक अथवा राष्ट्रीय सीमा बंदिस्त करू शकत नाही ,पाश्चात्य नृत्य कलेचे अनेक प्रकार भारतीय प्रेक्षकाला रुचतील अश्या प्रकारे सदर करण्याचा मनोदय असल्याने त्याचे सादरीकरण मनोज करतो ,आणि त्याच्या ह्या प्रयत्नांना अमाप लोकप्रियता मिळते आहे. ,
सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाल्याने बरचसे युवक ह्या कलेचे उपासक झाले आहेत , असाच ऐक कलोपासक नृत्याप्रेमी युवा जळगावचा "मनोज रंधे "
मनोज हा २१ वर्षाचा युवक आहे वयापेक्षाही मोठे कर्तृत्व प्राप्त झालेला हा युवक नृत्याला आपला आत्मा समजतो ,नृत्य कलेला गत वैभव प्राप्त करून देण्याच्या स्वप्नाने झपाटलेला हा युवक प्रतिभा आणि अथक श्रम ह्यांच्या जोरावर हे ऐक उपेक्षि कला दालन  पुनरोज्जीवित करण्याचा प्रयत्न करतोय  त्याची ऐक नृत्य संस्था आहे ,त्या संस्थेचे बरेचसे कार्यक्रम विनामूल्य असतात ,,अभिजात नृत्य प्रकार आजच्या युवा पिढीला आवडतील रुचतील अश्या प्रकारे सदर करणे  समाजातल्या नाहीरे वर्गांसाठी निशुल्क वर्ग चालवणे,लोककलांचे संशोधन सादरीकरण अश्या अनेक उपक्रमात व्यस्त असलेला मनोज युवा पिढीला ऐक आदर्श निर्माण करून दाखवतो आहे,आपल्या संस्थे द्वारा कित्येक युवकांना प्रगतीचा मार्ग दाखवतो आहे
विद्द्यर्थासाठी अतिशय अल्प मोबदल्यात तर कधी कधी निशुल्क प्रशालांचे आयोजन करणे हे ह्याचे आवडते सामाजिक कार्य ,
अगम्य प्रतिभेचे लेणे लाभलेला मनोज शत प्रतिशत भारतीय आहे मराठी मातीचा त्याला अभिमान आहे ,त्याच्या सर्व नृत्य प्रकार अभूतपूर्व यश संपादित करताहेत , काळाच्या ओघात पुसत होत चालेल्या लोककलांचे पुनारोत्जीवन करण्याच प्रयत्न मनोज नेटाने करतो आहे मनोजचे स्वप्न आहे कि मला नाचाचे नृत्य बनवायचे आहे आणि नटरंग ला नटराज .
शिव शंकर च्या नटराज स्वरूपाला मैत्रायानाचे सदर अभिवादन
शशांक रांगणेकर
मुंबई ९८२१४५८६०२





Friday, April 13, 2012

सुनील अग्रेसर


सुनील अग्रेसर
कदाचित आजच्या पिढीला माहित हि नसेल ,आमच्या लहानपणी एक घरघुती कालीडोस्कॉपे यायचा,नळीत तीन काचेच्या आरशाच्या त्रिकोणी आकाराच्या पिऱ्या मिड मध्ये काचेच्या रंगी बेरंगी बांगड्यांचे तुकडे घातलेले असत आणि त्यांचे प्रतिबिंब श्व्वाताच्या काचेच्या पडद्यावर दिसत असे ,रंगी बेरंगी ती प्रतिबिंबे आम्हा मुलांना फार आवडत तांस तास ते बघत राहणं हा माझ्या बालपणीच्या सर्व मुलांचा एक लाडका खेळ होता ,त्यात सर्वात मजेची गोष्ट म्हणजे एकदा दिसणारी रंगीत आकृती चित्र परत आकाराला येत नसे ,दर वेळेला एक वेगळीच आकृती दिसे आणि किंमत फार तर आठ आणे अथवा रुपया ,अर्थात त्यावेळी रुपयाही किंमत होती .
आता आयुष्याच्या संध्याकाळी असाच एक कालीदोस्कॉपे बघायला मिळतोय नाव "सुनील अग्रेसर",कलेच्या च्या सर्व क्षेत्रात आपला सुनील ठसा उमटवणारा हा सुनील अग्रेसर खरोखर सर्वार्थाने अग्रेसर आहे ,अभिनय ,दिग्दर्शन ,निर्मिती ह्या सर्व क्षेत्रात ठसा उमटवणारे बरेच प्रतिथ यश माझ्यापाहण्यात आहेत पण त्या यशाबरोबर सहृदय तेचे परोपकारी गुण विशेष मात्र ह्याच्या कडे आहेत.
नवागतांसाठी सिनेमा क्षेत्राच्या मायानगरीत एक विश्वासू मार्गदर्शकाचे व्रत अचारणारा सुनील हा जेव्हडा मोठा कलाकार त्याही पेक्षा मोठा माणूस आहे ,त्याचे व्रताच माणुसकीचे आहे मायानगरीत  नवागात प्रवेशणाऱ्याचे मनापासून "योग क्षेमं वहाम्यहम"म्हणत आपल्या अनुभवाचे भांडार सर्वांसाठी मुक्त कर णाऱ्या सुनील ला  मैत्रायण चा मानाचा मुजरा

शशांक रांगणेकर मुंबई ९८२१४५८६०२