चिरंजीव तन्मय'
रिकामटेकड्या लोकांबद्दल आलेला राग साहजिकच आहे,पण एक प्रेमाचा सल्ला देतो आहे,तू स्वताहून सतीचे वाण घेतले आहेस,तुझा मार्ग तू निवडला आहेस,
आणि ह्या मार्गावर तू इतका पुढे गेला आहेस कि आता माघार नाही,ह्या राग लोभाच्या फेऱ्यातून तुझ्या युयुत्सु आणि समाज प्रेमी भावनेने कधीचाच मुक्त
झाला आहेस ,तुझे कार्य फार मोलाचे आहे ज्यांना काहीही पडलेले नाही अश्या पडीक लोकांबद्दल विचार करण्याचे सोड बघूही नकोस,तुझी वैचारिक क्षमता आणि निरिच्छ वृत्ती ही तुझी देवदत्त कवच कुंडले आहेत
बाकी छोट्यामोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस,
शशांक रांगणेकर
शशांक रांगणेकर
Thursday, September 15, 2011
Tuesday, September 13, 2011
parivartan
चिरंजीव तन्मय,
परिवर्तन सक्रीय राजकारणात जरूर उतरावे,नाहीतर काठावर बसून पोहणे शिकवण्या सारखे होईल
,परिवर्तन किती आणि कसे परिवर्तन करेल हे कालच ठरवेल पण "केल्याने होत आहेरे आधी केलेच पाहिजे"
हे नक्कीच ,ज्या पद्धतीने परिवर्तन काम करत आहे ह्यातून एक गोष्ट कळते की हातात परिवर्तनाची मशाल
घेऊन हा काफिला निघाला आहे ,नक्कीच वाटते की मंझील अब दूर नही,आयुष्याची संध्याकाळी तुमच्या पिढीसाठी
तुमचे निष्काम भावनेने चालेले कार्य पाहून फक्त वयाने आलेल्या मोठे पणाला स्मरून मनापासून आशिर्वचने येतात"
"शुभास्ते पंथानः सन्तु"

Sunday, August 21, 2011
pratiyogi sahkarita
चिरंजीव तन्मय,
तु प्रतियोगी सहकारिता हा जो मुद्दा मांडला आहेस तो नक्कीच व्यवहार्य वाटतो "सर्व नाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः ,असेही म्हणतात ,
समजूतदार पणातून संघर्ष हा नक्कीच फलादाई ठरेल ,ह्या वयातही प्रतीत होणारी हि प्रतियोगी सहकारिता हा तोडगा तुझ्या बुद्धी प्रमाण्याला
अनुकूल असाच आहे,श्रीकृष्ण नीतीचे हे मनोहारी दर्शन हर आजच्या तरुणाई आदर्श वत ठरावे,तुझ्या सुबुद्ध मनोवृत्तीला मनापासून आशीर्वाद
आशीर्वाद हा शब्द्द फक्त वयाच्या आणि फक्त वयाच्या अंतराला आठवून वापरलेला आहे अथवा नमस्कार हाच शब्द त्यातल्या भावनासकट उचित असेल.

Wednesday, August 10, 2011
PRASAD GANPULE
चिरंजीव प्रसाद ,
तुझी सहा जीवन तत्वे वाचली ,आयुष्यात सुखी व्हायचा हा सहा पायऱ्यांचा सोपान मना पासून भावला. ,त्यातल्या त्यात
सहावी पायरी ,वयाच्या साठाव्या वर्ष पर्यंत कळले नाही ते साठ सेकंदात तुझ्या ह्या षडाक्षरी मंत्राने कळले.
मनापासुन,धन्यवाद आणि वयानी मोठा असल्यानी आशीर्वाद .
शशांक रांगणेकर
--
काही व्यक्ती त्यांच्या देह्बोलीनेच मनापासून सगळ्यांनाच आवडतात कदाचित त्याचे कारण त्यांच्या मनाची सात्विक वृत्ती ,प्रसाद गणपुले हे असेच एक प्रसन्न व्यक्तिमत्व
ज्ञान आणि बुद्धिमत्तेला मानवी चेहरा देणारा हा युवक चेहर्यानेच नव्हे तर मनानेही सहृदय वाटतो ,

Subscribe to:
Posts (Atom)